आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिलीप प्रभावळकरांना पुलं स्मृती सन्मान जाहीर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांना यंदाचा पुलं स्मृती सन्मान जाहीर करण्यात आला आहे. २५ हजार रुपये आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. पुलोत्सव कृतज्ञता सन्मान ‘मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्रा’ला तर पुलं तरुणाई सन्मान अभिनेत्री मृण्मयी देशपांडे व गायक स्वप्निल बांदोडकर यांना जाहीर झाले आहेत. आशय सांस्कृतिकच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या पुलोत्सवाचे यंदा तपपूर्ती वर्ष आहे. १७ ते २० डिसेंबर दरम्यान होणाऱ्या पुलोत्सवाचे उद‌्घाटन १७ डिसेंबरला ज्येष्ठ साहित्यिक द. मा. मिरासदार यांच्या हस्ते होईल.

असे होतील कार्यक्रम १७ डिसेंबर : उद‌्घाटन, सांगीतिक अभिवाचन, गुण गाईन आवडी. १८ डिसेंबर : पं. मधुसूदन कानेटकर जन्मशताब्दीनिमित्त विशेष मैफल, कृतज्ञता सन्मान. १९ डिसेंबर : लघुपट महोत्सव, ‘मोंताज’ या पुस्तकाचे प्रकाशन, माहितीपट : बीइंग विथ अपू, निवडक लघुपट प्रदर्शन, पुलं स्मृती सन्मान वितरण व प्रभावळकरांची मुलाखत. २० डिसेंबर : तरुणाई सन्मान व सादरीकरण. स्वर अमृताचे : आनंद भाटे
बातम्या आणखी आहेत...