आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pune: 12 Th Student Sahil Shaikh Writes Paper By Foot

स्‍वप्नांचा पाठलाग: हा पायाने लिहितो बारावीचे पेपर, अपघातात हात झाले निकामी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - म्‍हणतात ना! इच्‍छेला जिद्दीजी साथ असली तर कठीण काहीच नसते. सध्‍या सुरू असलेल्‍या बारावीच्‍या परीक्षेत पायात पेन पकडून पेपर सोडवणा-या साहिल शेख या पुण्‍याच्‍या विद्यार्थ्‍याने हे दाखवून दिले आहे. परीक्षेत अपयश आले म्‍हणून विद्यार्थी खचून जातात, काही जण टोकाचा निर्णय घेऊन जीवनही संपवतात. अशांना साहिल नवीन दृष्‍टीकोन देऊ शकतो. साहिलला सीए व्‍हायचे..
- साहिल शेख हा पुण्याच्या पुना कॉलेजमध्ये वाणिज्य शाखेची 12 वीची परीक्षा देत आहे.
- चार वर्षांपूर्वी विजेचा धक्‍का लागून झालेल्‍या अपघातात साहिलचे हात निकामी झाले.
- त्‍याला पहिल्‍या वर्षात पायाने लिहिणे कठीण गेले.
- मात्र, सध्‍या बोर्डाच्‍या परीक्षेत लेखनिक न घेता साहिल स्वत:च पायाने उत्तरपत्रिका लिहितो.
- साहिलला सीए व्‍हायचे आहे. हे स्वप्न त्‍याला शांत बसू देत नाही.
पायाने लिहून दहावी उत्‍तीर्ण..
- शाळेच्या स्नेहसंमेलनातील कार्यक्रमांचा सराव करताना साहिलचा अपघात झाला होता.
- पायाने लिखाण करून साहिल दोन वर्षांपूर्वी दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाला.
- साहिलच्या परिस्‍थितीमुळे त्‍याच्‍या शिक्षणाची जबाबदारी कॉलेजनेच उचलली आहे.
- तो सुवाच्च अक्षरात अगदी उत्तरपत्रिकेवर नीट ओळी आखून पायाने लिहितो.
पुढील स्‍लाइड्सवर पाहा, साहिलचे अक्षर, कसा लिहितो पायाने..