आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गणरायासमोर आंब्याची आरास

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - अक्षय्य तृतीयेला आंब्याचा मान असतो. हेच औचित्य साधून पुण्यातील प्रसिद्ध श्रीमंत दगडूशेठ हलवाई व ग्रामदैवत कसबा गणेशासमोर सोमवारी आम्रफळांची आरास मांडण्यात आली. कसबा गणेशाचा गाभारा आम्रफळांनी तुडुंब भरला होता. श्रीमंत दगडूशेठ गणेशासमोर तब्बल अकरा हजार आंब्याची आरास मांडण्यात आली होती. मस्तकावर शिंदेशाही पगडी, सुवर्णाचे - रत्नजडित अलंकार, रेशमी वस्त्रप्रावरणे ल्यायलेली श्रीची मूर्ती चांदीने लखलखणार्‍या गाभार्‍यात विराजमान झाली होती.