आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आज दुसर्‍या टप्प्यात मतदान; पुणे आणि लातूर जिल्ह्यातील 14 नगरपालिकांचा समावेश

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई/पुणे- मिनी विधानसभा समजल्या जाणार्‍या राज्यातील नगरपालिका निवडणुकांचे आज दुसऱ्या टप्प्यात मतदान होत आहे. यात पुणे जिल्ह्यातील 10 आणि लातूर जिल्ह्यातील 4 नगरपालिकांचा समावेश असून मतदानास सुरुवात झाली आहे. पुण्याच्या बालेकिल्ल्यात अस्तित्व टिकवण्यासाठी राष्ट्रवादीला चांगलाच जोर लावाल्याचे चित्र दिसत आहे.

दरम्यान, पहिल्या टप्प्यात 164 नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीची पीछेहाट झाली आहे. नगराध्यक्षपदांमध्ये राष्ट्रवादी चौथ्या क्रमांकावर आहे. परिणामी पुण्यात राष्ट्रवादीची अशीच पिछेहाट झाल्यास भविष्यात राष्ट्रवादीवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. 39 सदस्यीय नगरपालिकेत बहुमत मिळविण्याबरोबरच नगराध्यक्ष निवडून आणण्याचे अजित पवार यांच्यासमोर मोठे आव्हान आहे.

औरंगाबादेत आज महापौर आणि उपमहापौरपदासाठी निवडणूक
दुसरीकडे, औरंगाबादमध्येही महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौरपदासाठी आज निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीसाठी सर्व पक्षांनी अर्ज भरले असल्यामुळे महापौर आणि उपमहापौर पदासाठी कोण बाजी मारणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा...146 नगरपालिकांमध्ये सत्ता कोणाची?
बातम्या आणखी आहेत...