आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणे- स्वच्छतागृहात महिलांचे मोबाइलमध्ये फाेटाे काढणारा अटकेत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
 पुणे- स्वच्छतागृहात महिलांचे मोबाइलमध्ये फोटो काढणाऱ्या तरुणाला पोलिसांनी  खराडी येथील वर्ल्ड ट्रेड सेंटर टाॅवरच्या ट्रायंट ग्लाेबल सर्व्हिसेस प्रा. लि. कंपनीतून अटक केली. राजकमल राजबहादूर यादव (२४, मू. रा. बिहार) असे  अाराेपीचे नाव अाहे. यादवविराेधात २६ वर्षीय तरुणीने तक्रार दिली आहे.  

सदर तरुणी ही ट्रायंट ग्लाेबल सर्व्हिसेस कंपनीत गेल्या दोन वर्षांपासून काम करते. साेमवारी अधिक काम असल्याने ती रात्री उशिरापर्यंत ऑफिसमध्ये थांबली हाेती. रात्री पावणेदहाच्या सुमारास ती कंपनीच्या पाचव्या मजल्यावरील महिलांच्या स्वच्छतागृहात गेली. स्वच्छतागृहाचे पार्टिशन व छतात थाेडी माेकळी जागा अाहे. तरुणी स्वच्छतागृहात गेली असता यादव तिथे आधीच लपून बसला होता. या वेळी तरुणीला आपले कुणी तरी फोटो काढत असल्याचे जाणवले. त्यामुळे तिने बाहेर येऊन आरडाओरडा केला. त्यानंतर सुरक्षा रक्षकांनी त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.  
 
बातम्या आणखी आहेत...