पुणे- मूळचा पुण्याचा व आता आयआयटी खरगपूर येथे कॉम्प्युटर सायन्सचा विद्यार्थी असलेल्या अभिषेक पंत याला जगविख्यात
गुगल कंपनीने वार्षिक दोन कोटी रूपयांची ऑफर दिली आहे. 22 वर्षाच्या अभिषेकने नुकतेच गुगलमध्ये तीन महिन्यांची इंटर्नशिप केली होती. गुगलच्या कॅलेफोर्नियातील मुख्यालयातील डिझाईन सल्यूशन सेलमध्ये इंटर्नशिप करण्यासाठी अभिषेकला खूप कठीन परीक्षा व मुलाखतीला सामोरे जावे लागले होते. मात्र तेथे त्याने आपली गुणवत्ता सिद्ध केली व गुगलने थेट त्याला आता 2 कोटींची ऑफर दिली आहे. अभिषेक डिझाईन सल्यूशन सेल टीमचा सदस्य राहील.
अमेरिकेत जन्मलेल्या व तेथेच बालपण घालवलेला अभिषेक पंत 2006 साली भारतात कुटुंबासह परतला. पंत यांचे कुटुंबिय भारतात परतले तेव्हा ते अभिषेकच्या शिक्षणाबाबत चिंतित होते. मात्र, येथील स्थानिक परिस्थितीशी जुळवून घेत अभिषेक दहावीच्या सीबीएसई परीक्षेत पुणे शहरात पहिला आला. डीपीएसचा विद्यार्थी असलेल्या अभिषेकने दहावीत 97.6 टक्के गुण मिळवले होते.
अभिषेकने आपल्या गुगलमधील निवडीबाबत सांगितले की, पुणे ते खरगपूर आणि तेथून कॅलेफोर्निया हा प्रवास जबरदस्त थ्रील असा अनुभव देणारा राहिला. मला गुगलमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी मिळाली. त्या संधीचे सोने केले. आता माझ्याकडे गुगलच्या इंटर्नशिपचा अनुभव आहे. गुगलमध्ये माझ्या आवडीच्या क्षेत्रात काम करण्याची संधी मिळणार असल्याने मी फारचा उत्साही व आनंदी आहे.
इंटर्नशिपच्या निवडीबाबत अभिषेक म्हणाला, गुगलमध्ये इंटर्नशिप करण्याची माझी इच्छा होती. त्यासाठी मी दोन टेलिफोनिक इंटरव्यू दिले. टेलिफोनिक इंटरव्यूनंतर मला गुगल डॉक्यूमेंटबाबत कोडिंग करण्यास सांगितले. त्यानंतर प्रोजेक्ट मॅनेजरने माझी अंतिम मुलाखत घेतली. मे 2015 मध्ये मी भारतातून कॅलेफोर्नियातील गुगलच्या मुख्यालयात तीन महिन्यांसाठी इंटर्नशिपसाठी दाखल झालो. तीन महिन्यांच्या इंटर्नशिपनंतर मला प्रोजेक्ट मॅनेजरने एका खास प्रोजेक्टसाठी ऑफर दिली. यासाठी खूपच कठिण इंटरव्यू घेतले गेले. अखेर माझी निवड झाली. मी सप्टेंबर 2016 मध्ये गुगल ज्वाईन करणार आहे. सध्या कंपनीने मला कोणत्याही प्रोजेक्टवर काम करण्यास सांगितलेले नाही. मात्र, पुढील वर्षी डिझाईन सल्यूशन सेलमध्ये काम करणार आहे. जेथे यूझर्सच्या समस्यांचे निवारण केले जाते.
गुगल कंपनीतील वातावरणाबाबत अभिषेक म्हणाला, गुगलमध्ये टेस्टी व मोफत मिळणा-या फुडबाबत मी फारच उत्साही आहे. तेथे अमेरिकन, मेक्सिकन, साऊथ अमेरिकन, इटालियन आदी जगभरातील तमाम डिश चाखायला मिळतात. तेथे खास भारतीय कॅफेटेरियाही आहे. इंटर्नशिपच्या काळात मी या सर्व फूडवर जाम ताव मारायचो.
पुढे वाचा, IIT खरगपूरने अभिषेकच्या पॅकेजवर काय प्रतिक्रिया दिली...