आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: मानसीच्या बोलक्या डोळ्यांची पुणेकरांना भुरळ, मुळची आहे औरंगाबादकर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे/औरंगाबाद: औरंगाबादच्या मानसी करजगावकर हिने अंजना मस्कारन्हास आणि कार्ल मस्कारन्हास यांच्या ‘दिवा’ संस्थेने आयोजित केलेला 'दिवा मिसेस पुणे' स्पर्धेत सहविजेत्याचा किताब पटकावत मिसेस इंडिया आर्चज स्पर्धेत थेट प्रवेश मिळवला आहे. सॉफ्ट स्किल्स ट्रेनर आणि इमेज कन्सल्टंट म्हणून सेलिब्रिटीजना इमेज बिल्डिंगचे समुपदेशन देणाऱ्या मानसीच्या बोलक्या डोळ्यांनी पुणेकरांना भुरळ पाडली. ती आयकॉनिक आइज अॅवार्डची मानकरी ठरली आहे. देश-विदेशात रिसर्च पेपर प्रकाशित झालेली मानसी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात मानसशास्त्रात पीएचडी करत आहे.
 
दोन कॅटेगरीत झाली स्पर्धा 
‘दिवा’ संस्थेने आयोजित केलेली 'दिवा मिसेस पुणे' स्पर्धा ही क्लासिक आणि रेग्युलर अशा दोन कॅटेगरीत पार पडली. क्लासिक कॅटेगरीत  35 ते 55 या वयोगटातील स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता. या कॅटेगरीत कविता पद्मराजन विजेती ठरली तर फस्ट रनरअपचा किताब मानसी माळीने पटकावला आणि सेकंड रनरअप ठरली प्रीती नायडू. या कॅटेगरीत बेस्ट आयकॉनिक आयचा अवॉर्ड प्रीती नायडूने आपल्या नावी केला. तर कविता पद्मराजन ही अल्टिमेट दिवा ठरला. फस्ट रनरअप ठरलेली मानसी माळी हिला बेस्ट बॉडी या अवॉर्डने गौरविण्यात आले. 
 
रेग्युलर कॅटेगरीत 20 ते 32 वयोगटात अनायसा देबू हिने विजेतेपद पटकावले. मानसी करजगावकर फस्ट रनर अप आणि स्मिता जायस्वाल ही सेकंड रनरअप ठरली. या कॅटेगरीत मानसी करजगावकरला आयकॉनिक आय, स्मिता जायस्वालला बेस्ट कॅटवॉक आणि अनायसा देबूला रेडियन्स या किताबाने सन्मानित करण्यात आले. या सौंदर्य स्पर्धेसाठी पल्लवी कौशिक, फराह अनवर आणि सोनल अग्रवाल यांनी परीक्षकाची भूमिका बजावली होती. 

पुढे वाचा, मानसी करजगावकर मिस इंडियासाठी पात्र.. आणि सोबतच बघा या स्पर्धेची खास क्षणचित्रे...  
बातम्या आणखी आहेत...