आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भोसरी एमआयडीसीतील फायबर कंपनीला आग, पहाटे 3 वाजता उडाला भडका

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - भोसरी एमआयडीसीमधील फायबर कंपनीला सोमवारी पहाटे आग लागली. या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसली तर कंपनीचे मोठे नुकसान झाले आहे. आग विझवण्यासाठी 12 बंब बोलवण्यात आले होते. 4 तासांनंतर आग आटोक्यात आली.
 
कुठे लागली आग 
- भोसरी एमआयडीसीतील सुवर्ण फायब्रोटेक या फायबर कंपनीला पहाटे साडेतीनच्या सुमारास अचानक आग लागली. 
- आग विझवण्यासाठी अग्निशामक दलाच्या 12 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. 
- आगीची सुरुवात इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील मटेरियल रुमपासून झाली. मटेरियल रुमला आग लागल्यानंतर क्षणात आगीने रौद्ररूप धारण केले. 
- यात कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र आगीने कंपनीचे मोठे नुकसान झाले आहे.
 
घटनास्थळी पोहोचले 12 बंब 
- खडकी, भोसरी, तळवडे, राहटणी, प्राधिकरण तसेच अन्य कंपनीच्या अग्निशमन दलाच्या गाड्या बोलाविण्यात आल्या होत्या. 
- जवानांच्या अथक प्रयत्नानंतर चार तासांनी आग नियंत्रणात आली असल्याची माहिती अग्निशमन दलाने दिली आहे. 
- कंपनीत प्लॅस्टिकचे मटेरियल अधिक असल्याने आग विझविण्यासाठी अधिक मेहनत घ्यावी लागली.
बातम्या आणखी आहेत...