आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pune Bjp 3 Mla File A Nomination Form Today At Collector Office

PHOTOS: पुण्यात भाजपच्या तीन आमदारांसह चार उमेदवारांचे अर्ज दाखल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- पुणे शहरातील भारतीय जनता पक्षाच्या तीन विद्यमान आमदारांसह चार मतदारसंघातून भाजपच्या उमेदवारांनी आज अर्ज दाखल केले. कसबा विधानसभा मतदार संघातील विद्यमान आमदार गिरीश बापट यांनी आज सकाळी मामलेदार कचेरी येथे उमेदवारी अर्ज दाखल केला. पर्वती विधानसभा मतदारसंघातील आमदार माधुरी मिसाळ यांनी जिल्हा परिषद इमारतीमध्ये अर्ज भरला. खडकवासला विधानसभा मतदार संघाचे विद्यमान आमदार भीमराव तापकीर यांनी अर्ज भरण्यासाठी धनकवडी येथून फेरीने सुरवात केली व तहसीलदार कचेरीत अर्ज दाखल केला. कोथरुड विधानसभा मतदार संघातून नगरसेविका मेधाताई कुलकर्णी यांनी विधानसभेसाठी अर्ज दाखल केला.
कसबा, पर्वतीस खडकवासला भाजपचे आमदार आहेत. तर, कोथरूड मतदारसंघात सध्या शिवसेनेचे चंद्रकांत कोकाटे आमदार आहेत. कोथरूड मतदारसंघ युतीच्या जागावाटपात सेनेकडे होते. या भागात ब्राम्हण समाजाची मोठी लोकसंख्या असल्याने येथे भाजपला पूरक मतदान होते. मागील अनेक दिवसापासून भाजपने शिवसेनेकडे कोथरूड मतदारसंघ सोडावा अशी मागणी केली होती. मात्र सेना तयार नव्हती. अखेर युती तुटली असून, भाजपने मेधा कुलकर्णी यांना तेथून उमेदवारी दिली आहे.
मेधा कुलकर्णींनी उमेदवारी अर्ज दाखल केला त्याचे फोटो पुढे पाहा...