आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pune Bjp Critics On Rahul Gandhi's Speech About Hatryed & Nathuram Ghodase

नथुराम गोडसेचे नाव घेऊन समाजाला बदनाम करणे ही काँग्रेसचीच संस्कृती- भाजप

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- एका व्यक्तीच्या चुकीच्या कृत्याची शिक्षा संपूर्ण समाजाला देण्याची संस्कृती काँग्रेसचीच आहे हे शिखांच्या हत्याकांडाने दाखवून दिले आहे. त्यामुळे पुण्यात येऊन नथुराम गोडसेचे नाव घेत संपूर्ण समाजाला बदनाम करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. ती भारतीय जनता पक्षाची संस्कृती नाही अशा शब्दात भाजपचे माजी खासदार व शहर निवणडूक प्रमुख प्रदीप रावत यांनी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर टीका केली.
राहुल गांधी यांनी मंगळवारी झालेल्या जाहीर सभेत गोडसेच्या नावाने भारतीय जनता पक्षावर टीका केली. त्याला रावत यांनी पत्रकार परिषदेत प्रत्युत्तर दिले. पत्रकार परिषदेला भाजपचे पुण्यातील उमेदवार अनिल शिरोळे, आमदार श्रीमती माधुरी मिसाळ, शिवसेनेचे शहर अध्यक्ष श्याम देशपांडे उपस्थित होते.
रावत म्हणाले, राहुल गांधी यांनी नथुराम गोडसे प्रकरणाचा उल्लेख त्यांच्या जाहीर सभेत पुण्यात पुन्हा केला. एका व्यक्तीच्या चुकीची शिक्षा संपूर्ण समाजाला देण्याची भाजपची संस्कृती भाजपची नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने कधीही अशी शिकवण दिलेली नाही. संपूर्ण समाजाला शिक्षा देण्याची संस्कृती काँग्रेसचीच असल्याचे शिखांच्या हत्याकांडाच्या प्रकरणावरून दिसून येतेच.
भाजपने कोणावरही वैयक्तिक पातळीवर टीका केलेली नाही. एका नेत्याने त्याच्या सभेत अनिल शिरोळे यांची टिंगल केली. मात्र अशी टिंगल करणे हे निकोप स्पर्धेत बसत नाही. ही काही सभ्य प्रचार पद्धती नक्कीच नाही असे रावत म्हणाले.
शिरोळे म्हणाले, शिवसेना, रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी प्रचारात उत्स्फूर्त सहभाग घेतला. जनतेसह सर्वांचीच सोबत मला मिळाली. हतबल जनतेला दैनंदिन जीवनात भोगाव्या लागणाऱया समस्या सोडविण्यासाठी मी बांधील आहे.
श्याम देशपांडे म्हणाले, मतदारयाद्यांमध्ये झालेला गोंधल जाणीवपूर्वक केल्याची शंका येत आहे. तरीही महायुतीच्या कार्यकर्त्यांनी केलेले प्रयत्न आणि मतदार जागरूक झाल्यामुळे शिरोळे पुण्यातून 75 हजाराच्या मताधिक्याने जिंकतील असा आम्हाला विश्वास आहे.