आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pune BJP Delegation Meet To Hon. Vinkaia Naidu On Pune Metro Issue

पुणे मेट्रो प्रोजेक्टसंदर्भात पुणे भाजपच्या शिष्टमंडळाने घेतली व्यंकय्या नायडूंची भेट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(छायाचित्र- आमदार गिरीश बापट यांच्यासह आमदार भीमराव तापकीर, प्रदेश चिटणीस मेधा कुलकर्णी, योगेश गोगावले, अशोक येनपुरे, उज्ज्वल केसकर यांच्या शिष्टमंडळाने व्यंकय्या नायडूंची भेट घेतली.)
मुंबई- पुणे मेट्रो प्रोजेक्टसंदर्भात पुण्यातील भाजपचे आमदार गिरीश बापट यांच्या नेतृत्त्वाखाली शिष्टमंडळाने केंद्रीय नगरविकासमंत्री व्यंकय्या नायडूंची सविस्तर भेट घेतली. याचबरोबर पुणे मेट्रो प्रकल्पाला मंजूरी देताना सर्वसामान्यांना परवडणारी व नागरिकांना सोयीची होईल याची खबरदारी घ्यावी अशी मागणी केली.
पुणे मेट्रोसंदर्भात राज्य सरकार राजकारण करीत असून डीपीआरमधील त्रुटींची पूर्तता करण्यात स्वत अयशस्वी झाल्याचे खापर केंद्र सरकारवर ठेवत असल्याचे या शिष्टमंडळाने नायडूंच्या निदर्शनास आणून दिले. या शिष्टमंडळात आमदार बापट यांच्यासह, आमदार भीमराव तापकीर, प्रदेश चिटणीस मेधा कुलकर्णी, योगेश गोगावले, अशोक येनपुरे, उज्ज्वल केसकर यांचा समावेश होता.
4 डिसेंबर 2013 ते 9 मे 2014 या काळात राज्यात व केंद्रात यूपीए व आघाडीचे सरकार असतानाही केंद्राने (यूपीए सरकारने) मेट्रोतील त्रुटी दूर करण्याबाबत सुचविले होते. मात्र, या त्रुटीची पूर्तता तेव्हापासून केंद्रातील सरकार बदलेपर्यंत व बदलल्यानंतरही केली गेली नाही. 22 ऑगस्ट रोजी मोदी सरकारकडे केवळ एक इमेलद्वारा दुरुस्त डीपीआर पाठवण्यात आला. यात मुख्यमंत्री, राज्य सरकार व स्थानिक पुणे मनपा प्रशासन उदासिन व बेजबाबदार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
22 ऑगस्ट रोजी ईमेल केला असता 18 ऑगस्ट रोजी पत्रकार परिषद घेऊन दिरंगाईचे खापर एनडीए सरकारवर फोडणे योग्य नाही असे मत नायडूंनी यावेळी व्यक्त केले. तरीही पुणे मेट्रो संदर्भात सर्वांशी चर्चा करून आवश्यक चर्चा करून त्रुटींची पूर्तता करण्यासंदर्भात योग्य पावले उचलण्यासाटी स्वतंत्र वेळ देणार असल्याचे नायडू यांनी सांगितले.
पुढे या भेटीचे छायाचित्र पाहा...