आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यातील तिकिटासाठी भाजपकडे गर्दी वाढली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - पुणे शहर आणि जिल्ह्यात भारतीय जनता पक्ष लढवत असलेल्या विधानसभेच्या आठ जागांसाठी मंगळवारी 85 इच्छुकांनी मुलाखती दिल्या. राष्ट्रवादी कॉँग्रेसचे वर्चस्व असलेल्या ग्रामीण भागात यापूर्वी भाजपला उमेदवारही मिळत नव्हते. आता मात्र या ठिकाणीही उमेदवारांची गर्दी वाढली आहे.

ज्येष्ठ नेते हरिभाऊ बागडे आणि पांडुरंग फुंडकर यांना भाजपने निरीक्षक म्हणून पाठवले होते. या दोघांनी मंगळवारी मुलाखती घेतल्या. पुणे जिल्ह्यातील आमदार गिरीश बापट, माधुरी मिसाळ आणि संजय भेगडे यांनीही निरीक्षकांची भेट घेतली. पत्रकारांशी बोलताना बागडे म्हणाले, ‘केंद्रानंतर आता राज्यातही सत्तापरिवर्तनाची लाट आहे. निवडणुकीच्या तोंडावर तिकिटासाठी येणार्‍या इतर पक्षातील कार्यकर्त्यांपेक्षा पक्षाच्या निष्ठावान कार्यकर्त्यांना प्राधान्य देणार असल्याचे ते म्हणाले.

भाजपच्या वाट्याला येणार्‍या सर्व मतदार संघांत इच्छुकांच्या मुलाखती घेण्यासाठी 15 टीम तयार करण्यात आल्या होत्या. राज्यातील सर्व मुलाखती 5 ऑगस्टला संपल्या असून 15 ऑगस्टपर्यंत यादी जाहीर होईल.