आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Pune Blast Case Revolves Around Suspect Dayanand Patil

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पुणे स्फोटातील जखमी पाटीलसह सहा ताब्यात

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- पुण्यात बुधवारी झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. बालगंधर्व रंगमंदिराजवळील स्फोटातील जखमी टेलर दयानंद पाटील, त्याची पत्नी सत्यशीला या प्रकरणी पोलिसांनी स्फोटातील जखमी दयानंद पाटीलसह त्याची पत्नी सत्यशीला, शेजारी राहणा-या रमजान शेख व गुलाबो शेख यांना ताब्यात घेतले आहे. याशिवाय पाटीलचा मेहुणा, उस्मान टेलर चाचा आणि अल्ताफ यांचीही ताब्यात घेऊन चौकशी करण्यात येत आहे.
तपासासाठी राष्ट्रीय तपास यंत्रणा आणि नॅशनल सेक्युरिटी गार्ड्सची पथके पुण्यात पोहोचली आहेत. देना बँक, मॅक्डोनल्ड्स, गरवारे चौक आणि बालगंधर्व रंगमंदिराजवळ चार स्फोट झाले होते. सूत्रांनुसार पाटील काही महिन्यांपूर्वी जॉर्डनला जाऊन आल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. पाटीलचे जबाबही विसंगत असल्याने पोलिसांनी त्याला क्लीनचिट दिलेली नाही. एटीएसच्या हाती महत्त्वाचे धागेदोरे लागले आहेत. त्याबाबत शुक्रवारी माहिती दिली जाण्याची शक्यता आहे. एटीएसचे पथक कर्नाटकातही रवाना झाले आहे.
सीसीटीव्ही कॅमेरे बंद होते
एटीएस, एनआयए आणि एनएसजीच्या तपासात चौकात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमे-यांची मदत मिळत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. देना बँक, गरवारे चौकात लावण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे बंद होते. 13 फेब्रुवारी 2010 रोजीच्या जर्मन बेकरी स्फोटानंतर शहरात 70 कॅमेरे लावण्यात आले होते. परंतु त्याच्या देखभालीवरून मनपा आणि पोलिसांत वाद असल्याने कॅमेरे बंद पडले होते.
स्फोटके सांगणार कट कोणाचा
फोरेन्सिक तज्ज्ञांनी स्फोटके तयार करण्याची पद्धत आणि त्यात वापरलेल्या पदार्थांचा तपास सुरू केला आहे. त्याआधारावर स्फोटामागे कोणता गट आहे, याचा माग काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. तज्ज्ञांच्या मते, प्रत्येक गटाची आपली शैली असते. या स्फोटांत बॅटरीवर चालणा-या डिटोनेटरला डिजिटल टायमर लावण्यात आल्याची शंका आहे.
अज्ञात लोकांवर गुन्हा
पोलिसांनी अज्ञात लोकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. भादंवि कलम 307, 427, 120 बीनुसार तसेच स्फोटक पदार्थ कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
स्फोट पूर्वनियोजित - सिंह
500 मीटरच्या परिघात 48 मिनिटांत स्फोट झाले आहेत. हा पूर्वनियोजित कट होता, असे मला वाटते. सेंट्रल फोरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीचे पथकही पुण्यात दाखल झाले आहे. त्यांनी दोन आयईडी हस्तगत केले असून, त्यात तीन-तीन डिटोनेटर लावण्यात आलेले होते.

शिंदे यांनी बैठक घेतली
देशातील सुरक्षा व्यवस्थेवर केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी दिल्लीत गुरुवारी उच्चस्तरीय बैठक घेतली. हे स्फोट केंद्राने प्रचंड गांभीर्याने घेतले आहेत. धागेदोरे शोधून काढण्यासाठी तपास यंत्रणा आटोकाट प्रयत्न करत आहे, असे शिंदे यांनी बैठकीनंतर सांगितले.
पुणे : स्फोट नियोजित व संघटित कृत्य- केंद्रीय गृहसचिव
पुणे धर्मशाळा झाली, सरकार आता तरी शहाणे होणार का - विरोधीपक्षाचा सवाल
पुणे स्‍फोट : पत्रातून दिली होती धमकी, संशयित दयानंद पाटलांच्या बायकोची चौकशी