आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पुणे स्फोट: संशयित दयानंदचा दुवा कच्चा; तपासाला दिशा नाही, आरोपींची रेखाचित्रे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - पुण्यात चार बॉम्बस्फोट झाल्याच्या घटनेला दोन दिवस उलटल्यानंतरही पोलिस यंत्रणेला अद्याप तपासाची दिशा निश्चित करता आलेली नाही. स्फोटातील एकमेव जखमी व संशयित दयानंद पाटील हा दुवाही कच्चा असल्याचे शुक्रवारी सिद्ध झाले. त्यामुळे बॉम्ब पेरण्यात आलेल्या सायकलींची खरेदी करणा-यांचा शोध घेण्यावर यंत्रणांनी भर दिला. गुजराती उच्चाराचे हिंदी बोलणा-या सायकल खरेदी करणा-यांची रेखाचित्रे तयार करण्यात आली. मात्र, ती जाहीर न करता पोलिसांपुरताच त्यांचा वापर केला जाणार आहे.
दयानंद पाटील (वय 33) स्फोटाच्या रात्री जखमी झाला. त्याच्या हाती असलेल्या पिशवीमध्येच स्फोट झाला होता. त्यामुळे गेल्या दोन दिवसांत पोलिसांनी पाटीलकडे लक्ष केंद्रित केले होते. पाटील जॉर्डनला सात महिने वास्तव्य करून आल्याचे समजल्यानंतर त्याचे आंतरराष्ट्रीय दहशतवादी गटांशी संबंध असल्याच्या संशयावरून चौकशी सुरू झाली. पाटील याची पत्नी, दोन नातेवाईक आणि त्याचे शेजारी रमजान शेख, मेहबुबा शेख, अल्ताफ शेख यांचीही चौकशी सुरू झाली होती. परंतु, यातून काहीच निष्पन्न न झाल्याने या सर्वांना शुक्रवारी सोडून देण्यात आले. पाटील अजूनही पोलिस बंदोबस्तात उपचार घेत आहे. दीड वर्षांपासून पुण्याजवळ उरुळी कांचन येथे राहणारा पाटील मूळ कर्र्नाटकातील बीदर येथील रहिवासी आहे. दहशतवाद विरोधी पथक कर्नाटकातही चौकशीसाठी गेले आहे. सखोल चौकशीनंतर तो निर्दोष ठरल्यास त्याला दोन दिवसात मुक्त केले जाईल.

कारणे अस्पष्टच
स्फोटातील रासायनिक पदार्थांबाबत पोलिसांनी कोणतीही माहिती दिली नाही. न्यायवैद्यक प्रयोगशाळेचा अहवाल आला नसल्याचे गुन्हे शाखेचे अप्पर पोलिस आयुक्त शहाजी साळुंके यांनी सांगितले. स्फोटासाठी दहा किलो अमोनिअम नायट्रेटचा वापर करण्यात आला. मात्र, पावसाळी हवेतील आर्द्रतेमुळे तसेच जोडणीतील गफलतीमुळे पूर्ण क्षमतेने स्फोट झाला नसल्याचा दावा करण्यात येत होता. मात्र, यात कोणतेही तथ्य नसून सातही स्फोटांमध्ये मिळून जेमतेम एक किलो अमोनिअम नायट्रेटचा वापर झाला असावा, असे एका वरिष्ठ पोलिस
अधिका-याने सांगितले.
पुणे स्फोट : पावसाच्या हलक्या सरींनी वाचविले शेकडो पुणेकरांचे प्राण
पुणे स्‍फोटः अलर्ट मिळूनही पोलिस यंत्रणा गाफील!
पुणे स्फोटातील जखमी पाटीलसह सहा ताब्यात
पुणे : स्फोट नियोजित व संघटित कृत्य- केंद्रीय गृहसचिव