आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

धोका मोठ्या हल्ल्याचा? ‘चाचणी’ घेतल्याच्या शक्यतेचा शोध

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - कमी तीव्रतेच्या चार स्फोटांमुळे पुण्यात कोणतीही हानी झाली नाही. नागरिकांमध्येही भीतीचे वातावरण नाही. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर दहशतवाद्यांनी ‘चाचणी’ तर घेतली नाही? तसे असल्यास पुण्याला भयंकर दहशतवादी हल्ल्याला सामोरे जावे लागेल, ही शक्यता गृहीत धरून तपास केला जात असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणेच्या वरिष्ठ अधिका-यांनी दिली.
जंगली महाराज रस्त्यावर बुधवारी चार स्फोट झाले. बॉम्बशोधक पथकाने तीन बॉम्ब निकामी केले. हे सर्व बॉम्ब कमी तीव्रतेचे होते. बॉम्बस्फोटासाठी निवडण्यात आलेले ‘स्पॉट’देखील तुलनेत कमी महत्त्वाचे होते. त्यामुळे दहशतवादी संघटनांनी ‘ड्राय रन’ घेतल्याची शक्यता गृहीत धरली जात आहे. मुंबईवरील 2६/11 च्या दहशतवादी हल्ल्यातील प्रमुख आरोपी अबू जिंदाल नुकताच
पोलिसांच्या ताब्यात आला. जिंदालने पुणे दहशतवाद्यांचे टार्गेट असल्याचे स्पष्ट केले. पोलिस यंत्रणांमध्ये सैलपणा आणण्यासाठी व नागरिकांमध्ये बेफिकिरी निर्माण करण्यासाठी दहशतवादी संघटनांकडून निनावी पत्रे, कुचकामी हल्ले केले जातात, असे सूत्रांनी सांगितले. अर्धा किलोमीटरच्या अंतरातील चार स्फोट अत्यंत कमी तीव्रतेचे होते. तीन बॉम्ब पोलिसांनी निकामी केले, यावरून दहशतवाद्यांनी पुरेशी तयारी केली नसल्याचे
अधिका-यांनी स्पष्ट केले.
पुणे स्फोट: संशयित दयानंदचा दुवा कच्चा; तपासाला दिशा नाही, आरोपींची रेखाचित्रे
पुणे स्फोट : पावसाच्या हलक्या सरींनी वाचविले शेकडो पुणेकरांचे प्राण
पुणे स्‍फोटः अलर्ट मिळूनही पोलिस यंत्रणा गाफील!