आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पुणे स्फोटाचा अहवाल आज सादर होणार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - पुणे शहरात 1 ऑगस्ट रोजी झालेल्या बॉम्बस्फोटातील जमा केलेल्या नमुन्यांचा फॉरेन्सिक अहवाल आज (मंगळवारी) दहशतवादविरोधी पथक व गुन्हे शाखा पोलिस यांना प्राप्त होणार आहे. स्फोटापासून आतापर्यंत केलेल्या तपासाचा आढावा एटीएसचे प्रमुख राकेश मारिया यांनी बैठकीदरम्यान घेतल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.
एटीएसच्या एका वरिष्ठ अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार, स्फोटाबाबत तपास यंत्रणा विविध गोष्टींची सध्या चाचपणी करत आहे. तपासात अजूनपर्यंत काही ठोस पोलिसांच्या हाती लागले नाही. स्फोटात वापरण्यात आलेल्या सायकलच्या दुकान मालकांकडे एटीएसने कसून चौकशी केली आहे. त्यांनी वर्णन केल्याप्रमाणे एटीएसने आरोपींची रेखाचित्रे तयार केली असली तरी ती जंगली महाराज रस्त्यावरील कोणत्या सीसीटीव्ही कॅमे-यात कैद झाली आहे का, याचे संबंध जुळवले जात आहेत. स्फोटात जखमी झालेला दयानंद पाटील व सायकल दुकानाचे मालक या दोघांच्या भोवतीच तपास यंत्रणा फिरत आहेत. पुण्याचे पोलिस आयुक्त गुलाब पोळ यांना स्फोटाच्या तपासाबाबत माहिती विचारण्यासाठी पत्रकार गेले असता, पोळ हे पोलिस अधिका-यांच्या बैठकीत बराच वेळ व्यग्र असल्याने ते उपलब्ध होऊ शकले नाहीत.