आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Pune Blast Shivsena Mp Manohar Joshi Blame State Govt.

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ना सरकारचा धाक, ना पोलिसांचा वचक, शिवसेना नेते मनोहर जोशी यांची टीका

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - राज्य सरकारचा धाक वाटत नाही आणि पोलिसांचा कुठलाही वचक दिसत नाही, त्यामुळेच बॉम्बस्फोटासारख्या घटना वारंवार घडत आहेत. पुण्यात बॉम्बस्फोट घडवणा-या दोषींवर कडक कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी शिवसेना नेते आणि माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी शुक्रवारी केली.
जंगली महाराज रस्त्यावरील स्फोट झालेल्या ठिकाणांची पाहणी केल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. शिवसेना उपनेत्या आमदार नीलम गोºहे या वेळी उपस्थित होत्या. पुण्यातील स्फोट तीव्र नसल्याने सुदैवाने हानी टळली, पण ही घटना दुर्लक्ष करण्याजोगी नाही, असे सांगून जोशी म्हणाले, हा हल्ला दहशतवादी हल्ला नाही हे सांगणा-या पोलिस आयुक्तांनी असे वक्तव्य लगेच करण्याची आवश्यकता नव्हती. अशा बोलण्याने गुन्हेगारांना उत्तेजन मिळते. याउलट दहशतवादविरोधी पथक सक्षम करणे, हाच यावर उपाय असल्याचे जोशी म्हणाले.
मुख्यमंत्र्यांना वेळ नाही
परस्परांशी भांडण्यात आणि एकमेकांची उणीदुणी काढण्यातच सरकारचा वेळ खर्ची पडत आहे. मुंबई काही पुण्याहून फार दूर नाही. तरीही स्फोटानंतर दोन दिवसांतही मुख्यमंत्र्यांना पुण्यात यायला अद्याप सवड झाली नाही, असा टोलाही जोशी यांनी लगावला.
पुणे स्फोट : पावसाच्या हलक्या सरींनी वाचविले शेकडो पुणेकरांचे प्राण
पुणे स्‍फोटः अलर्ट मिळूनही पोलिस यंत्रणा गाफील!
पुणे स्फोटातील जखमी पाटीलसह सहा ताब्यात
पुणे : स्फोट नियोजित व संघटित कृत्य- केंद्रीय गृहसचिव