आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pune Blast: SIMI's Three Terrorists Arrested In Odisha

पुणे स्फोट प्रकरणी ‘सिमी’चे तिघे ओडिशात अटकेत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - मध्य प्रदेशातील खांडव्याच्या तुरुंगातून २०१३ मध्ये पळून गेलेल्या सिमीच्या अतिरेक्यांच्या मुसक्या बांधण्यात पोलिसांना यश आले. गुप्तचरांच्या माहिती अाधारे स्पेशल अाॅपरेशन टीम, तेलंगण-अाेडिसा पाेलिसांनी मंगळवारी रात्री अाेडिसा-तेलंगणच्या सीमेवर राऊरकेला येथे इस्लामिक मूव्हमेंट अाॅफ इंडियाशी (सिमी) संबंधित दहशतवाद्यांवर छापा टाकला. तीन तासांच्या धुमश्चक्रीनंतर एका महिलेसह पाचजणांना अटक करण्यात अाली.

त्यापैकी तिघांचा पुण्यातील फरासखाना-विश्रामबाग पाेलिस ठाण्यात पार्किंगमधील दुचाकीच्या डिकीतील बाॅम्बस्फाेटाशी संबंध अाहे. शेख महेबूब ऊर्फ गुड्डू शेख ऊर्फ इस्माईल (३०),त्याची आई नजमाबी, अमजद रमजान खान (३५), झाकीर हुसेन बद्रुल हुसैन ऊर्फ सादिक (३३), (सर्व गणेश तलाई, खांडवा) व माेहंमद सालिक ऊर्फ सल्लू अब्दुल हकीम (खांडवा) अशी त्यांची नावे आहेत. यापैकी शेख महेबूब, अमजद खान व झाकीर हुसेन हे तिघे फरासखाना बाॅम्बस्फाेटाशी संबंधित आहेत.