आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हत्ती पळाला सैरावैरा, भोसरीकरांना भरली धडकी, PHOTOSमध्येे पाहा असा घातला धुमाकूळ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- पिंपरी-चिंचवड परिसरातील भाेसरी येथे काही दिवसांपूर्वी भरलेली रॅम्बाे सर्कस बंगळुरू येथे रवाना झाली. मात्र या सर्कसमधील काही हत्ती अजूनही भाेसरी परिसरातच मुक्कामी अाहेत.

बुधवारी सकाळी अंघाेळ घालत असताना यापैकी एक हत्ती साखळी ताेडून रस्त्यावर धावू लागला, त्यामुळे परिसरातील नागरिकांची मात्र पाचावर धारण बसली. हत्ती पिसाळल्याची अफवा पसरल्याने तर पळापळ वाढली. अखेर तीन तासांच्या प्रयत्नांनंतर पाेलिस कर्मचारी माहुतांना या हत्तीवर नियंत्रण मिळवण्यात यश अाले अन् सर्वांचाच जीव भांड्यात पडला.

भाेसरी येथील गाव जत्रा मैदानात मागील महिन्यात रॅम्बाे सर्कस भरली हाेती. १८ अाॅगस्ट राेजी ही सर्कस बंगळुरू येथे स्थलांतरित झाली. मात्र त्या ठिकाणी हत्तींना नेण्यास बंदी असल्याने सर्कसच्या अायाेजकांनी चार हत्ती भाेसरी येथेच ठेवले हाेते. या हत्तींचा सांभाळ करण्यासाठी चार माहुतांसह १० ते १२ कर्मचाऱ्यांना ठेवण्यात अाले अाहे. बुधवारी सकाळी माहूत नेहमीप्रमाणे या हत्तींना अंघाेळ घालत असताना, सर्वात लहान असलेला हत्ती साखळदंड ताेडून पळाला. परिसरात ताे सैरावैरा पळू लागला. त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड घबराट निर्माण झाली. हा हत्ती पिसाळला असून त्याने अनेकांना जखमी केल्याची अफवाही पसरली. त्यामुळे नागरिकांमध्ये अधिकच भीतीचे वातावरण निर्माण झाले. दरम्यान, तीन तास अथक प्रयत्न केल्यानंतर माहुतांनी हत्तीला पुन्हा बांधून ठेवले. पशुवैद्यकीय अधिकारी डाॅ.सतीश गाेरे यांनी या हत्तीची तपासणी केली. ‘ताे पिसाळलेला नव्हता, तर गर्दी पाहून ताे सैरावैरा पळत हाेता,’ असे ते म्हणाले.

या पुढील काळात असे प्रकार हाेऊ नयेत म्हणून सर्कस प्रशासनाने खबरदारी घ्यावी, अशा सूचना पाेलिसांनी दिल्या अाहेत.
पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करुन पाहा, हत्‍तीने हसा घातला धुमाकूळ..
पुढे वाचा, हत्‍तीला आली खेळण्‍याची लहर..
बातम्या आणखी आहेत...