आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेड लाईट एरियात आल्‍याची धमकी देत औरंगाबादच्‍या व्‍यक्तिकडून पुणे पोलिसांनी उकळले पैसे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - पुण्यातील रेड लाइट एरियात अाल्याने तुमच्यावर गुन्हा दाखल करू, अशी धमकी देऊन फरासखाना पाेलिस ठाण्याच्या दाेन पाेलिस कर्मचाऱ्यांनी २५ हजार रुपये उकळल्याची बाब उघडकीस अाली अाहे. याप्रकरणी अाैरंगाबाद येथे राहणाऱ्या ३९ वर्षीय व्यक्तीने ई-मेलद्वारे तक्रार केल्यानंतर दाेषी पाेलिस शिपायांविराेधात फरासखाना पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात अाला अाहे.  
 
अाैरंगाबाद येथील तक्रारदाराने दिलेल्या फिर्यादीनुसार, सहा मे राेजी ते दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास पुण्यातील रविवार पेठेत पाेलिस चाैकीसमाेरील लक्ष्मी राेड येथून कार घेऊन जात हाेते. त्या वेळी सदर ठिकाणी नाकेबंदी करणारे पाेलिस कर्मचारी गणेश साेनवणे व अनिल रासकर यांनी त्यांना तपासणीच्या नावाखाली थांबवून  त्यांच्याकडील माेबाइल, कारची किल्ली, लायसन्स हिसकावून घेतले. तुम्ही रेड लाइट एरियात अाल्यामुळे गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. तसेच गुन्हा दाखल न करण्यासाठी ३० हजार रुपयांची मागणी केली. तक्रारदाराने भीतीपाेटी दाेघांना २५ हजार रुपये  दिले. पैसे मिळाल्यानंतर पाेलिसांनी त्यांना माेबाइल फाेन, लायसन्स परत केले. तक्रारदाराने फिर्याद दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बातम्या आणखी आहेत...