आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हरित लवादाच्या आदेशानंतर पूररेषा क्षेत्रातील अनधिकृत बांधकामाच्या नळजोडाची पाहणी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- मुठा नदीच्या पूररेषा क्षेत्रातील अनधिकृत मंगल कार्यालये आणि हॉटेल पाडून टाकण्यासंदर्भात राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने (एनजीटी) दिलेल्या आदेशानुसार महापालिकेने कारवाईस सुरूवात केली आहे. त्यासाठी सर्वप्रथम पाणीबाणीचा मार्ग अवलंबला आहे. 
 
पाणीपुरवठा विभागाच्या अधिकार्‍यांनी शनिवारी नदीपात्रातील बांधकामांना दिलेल्या नळजोडांची पाहणी करून संबधितांना सोमवारी कागदपत्रे  सादर करण्याची डेडलाईन दिली आहे. त्यानंतर कारवाई करण्यासाठीची सज्जता करण्यात आली आहे. म्हात्रे पूल ते राजाराम पुलादरम्यान मुठा नदीच्या पूररेषा क्षेत्रातील अनधिकृत बांधकामे दोन आठवड्यात शोधून त्यापुढील चार आठवड्यात पाडून टाकावीत, असा आदेश एनजीटीच्या खंडपीठाने मंगळवारी पुणे महापालिका आणि जलसंपदा विभागाला दिला.
 
या कारवाईचा अहवाल सादर करण्यास एनजीटीने बजावले आहे. एनजीटीच्या आदेशाची प्रत महापालिकेला प्राप्त झाली असून त्यानुसार महापालिका आणि जलसंपदा विभागाच्या अधिकार्ऱ्यांनी नदीपात्रातील आणि निळ्या पूररेषेतील (ब्लू लाईन) बांधकामांचे शुक्रवारी संयुक्त सर्वेक्षण केले. त्यानंतर नदीपात्रातील अनधिकृत मंगल कार्यालये आणि हॉटेलमधील नळजोडांची पाहणी पालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील अधिकार्ऱ्यांनी केली. तसेच नळजोडासंदर्भातील अधिकृत कागदपत्रे सादर करण्याचे आदेश संबंधित मिळकतदारांना दिले. त्यानंतर अनधिकृत बांधकामांचे नळजोड काढून टाकण्याची कारवाई केली जाईल, अशी माहिती पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी सुनिल कदम यांनी दिली. 
बातम्या आणखी आहेत...