आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pune Court Reject Application For Chhagan Bhujabal

छगन भुजबळ यांचा फेरविचार अर्ज कोर्टाने फेटाळला

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- पुणे-अहमदनगर मार्गावर शिरूरजवळील पेरणे फाटा येथील टोलनाक्यावर बेकायदा टोलवसुली होत असल्याच्या आरोपावरून अशोका इन्फ्रास्ट्रक्चरचे सुनील रायसोनी, सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांच्यासह बांधकाम खात्यातील 20 अधिकार्‍यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून चौकशीचे आदेश शिरूरच्या न्यायालयाने दिले होते. याबाबत फेरविचार करण्याची याचिका भुजबळ यांच्यासह तिघांनी पुणे न्यायालयात सादर केली होती, ती न्यायाधीश विनय जोशी यांनी फेटाळून लावली. शिरूर न्यायालयातील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी जयश्री पुलाटे यांनी 6 जून 2012 रोजी गुन्हा दाखल करून चौकशीचा आदेश दिले होते. त्यानंतर भुजबळांनी सत्र न्यायालयात धाव घेतली. शनिवारी पुणे न्यायालयाने शिरूर न्यायालयाचे आदेश कायम ठेवले.