आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pune Court Reject Pile On Serial Boamblast Offenders

साखळी बॉम्बस्फोटातील आरोपींचा विनंती अर्ज पुणे कोर्टाने फेटाळला

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


पुणे - पुण्यातील साखळी बॉम्बस्फोटांच्या खटल्यातील आरोपींवर राष्‍ट्रीय तपास यंत्रणा कायदा आणि बेकायदा कारवाई प्रतिबंध कायद्यानुसार खटला चालवण्याचा अधिकार न्यायालयाला नाही. त्यामुळे या खटल्यात अटक करण्यात आलेल्या आरोपींची निर्दोष मुक्तता करावी, अशी मागणी करणारा आरोपीच्या वकिलांचा विनंती अर्ज अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही.व्ही. बंबार्डे यांनी सोमवारी फेटाळला.

या खटल्याचा तपास राष्‍ट्रीय तपास यंत्रणा कायद्यानुसार करण्यात येत नाही. एटीएसकडे स्वतंत्र न्यायालय असून या न्यायालयाने आरोपींना पोलिस कोठडी दिली होती. त्यामुळे हा अर्ज फेटाळण्यात येत असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. आरोपींना 15 दिवसांपेक्षा जास्त दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला होता. यानंतर हा खटला मुंबई येथे वर्ग करण्यात आला; परंतु 15 दिवसांपेक्षा अधिक काळ पोलिस कोठडी देण्याचा अधिकार नाही. त्यामुळे आरोपींची मुक्तता करावी, असे बचाव पक्षाच्या वकिलांनी म्हटले होते.