आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणे : ‘शादी डाॅट काॅम’वरून अाेळख; मैत्री वाढवून 35 वर्षीय महिलेने केला बलात्काराचा आरोप

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रतिकात्मक फोटो - Divya Marathi
प्रतिकात्मक फोटो
पुणे - विवाहाचे अामिष दाखवत एका महिलेने अाधी ‘शादी डाॅट काॅम’ या वेबसाइटवर पुण्यातील एका व्यक्तीची अाेळख करून घेतली. नंतर अाेळखीचे रूपांतर मैत्रीत झाले. काही दिवसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत संबंधित तरुणाकडे पाच लाख रुपयांची खंडणी मागण्यात अाली. याप्रकरणी संबंधित व्यक्तीच्या तक्रारीवरून मध्य प्रदेशातील इंदूरच्या ३५ वर्षीय महिलेवर चतु:शृंगी पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात अाला.
पुणे विद्यापीठ रस्ता येथे राहणाऱ्या ४९ वर्षीय व्यक्तीने याबाबत पाेलिसांकडे िफर्याद िदली अाहे. तक्रारदार यांनी शादी डाॅट काॅम या वेबसाइइटवर लग्नापूर्वी स्वत:चे नाव नाेंदवले हाेते. लग्न झाल्यानंतर त्यांनी त्यांचे नाव वेबसाइटवरून कमी करण्यास कळवले हाेते. जून २०१६ मध्ये तक्रारदार त्यांच्या राहत्या घरी असताना, अाराेपी महिलेने वेबसाइटवरून त्यांची माहिती घेऊन, वारंवार फाेन करून सलगी वाढवण्याचा प्रयत्न केला. तसेच व्हाॅट्सअॅपवर तिचे फाेटाे मेसेजही पाठवले. काही दिवसांनी या संबंधांचा गैरफायदा घेत संबंधित व्यक्तीकडे थेट पाच लाख रुपयांची मागणी केली; अन्यथा बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकीही दिली. बदनामीच्या धास्तीने संबंधित व्यक्तीने दाेन लाख १५ हजार रुपये एक साेन्याची चेन संबंधित महिलेला दिली. मात्र त्यावरही तिचे समाधान झाले नाही. तिने अाणखी पैशाची फ्लॅट खरेदी करून देण्याची मागणी केली. मागणी पूर्ण झाल्यास जिवे मारण्याची धमकीही दिली. या प्रकारानंतर संबंधित व्यक्तीने पाेलिसात फिर्याद दाखल केली अाहे.
बातम्या आणखी आहेत...