आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pune Crime Dairy, 10 Year Old Missing School Boy Found Dead

पुण्यातून अपहरण झालेल्या शाळकरी मुलाची हत्या झाल्याचे उघड

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(मृत ओंकार बनकर)
पुणे- चार दिवसापासून बेपत्ता असलेल्या दहा वर्षीय ओंकार बनकर या शाळकरी मुलाची हत्या झाल्याचे पुढे आले आहे. ओंकारचे बुधवारी त्याच्या राहत्या घरातून अपहरण केले होते. दरम्यान, आज ओंकारचा मृतदेह बोपदेव घाटात आढळून आला. ओंकारच्या हत्येप्रकरणी त्याच्या घराच्या शेजारी राहणा-या वृषाल काळाणेला अटक करण्यात आली आहे. याचबरोबर वृषालला मदत केल्याने त्याच्या आई-वडिलांना हडपसर पोलिसांनी अटक केली आहे.
हडपसर परिसरात राहणारा ओंकार इयत्ता चौथीत शिकत होता. बुधवारी दुपारपासून तो अचानक बेपत्ता झाला होता. दुपारी 12 वाजता घरी आल्यानंतर ओंकारने आपल्या वडिलांना फोन करून घरी आल्याची माहिती दिली होती. त्यानंतर घरी आई पोहचल्यानंतर घराचा दरवाजा उघडा होता तसेच टीव्हीही चालू होता. मात्र घरात ओंकार आढळून आला. त्यानंतर ओंकारच्या वडिलांनी हडपसर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिस तपास करीत असतानाच आज ओंकारचा मृतदेह बोपदेव घाटात आढळला. पोलिसांनी व ओंकारच्या पालकांनी खासगी गुप्तहेराची मदत घेतली होती. त्यात शेजारी राहणा-या वृषाल काळाणेंने ओंकारचे अपहरण करून त्याच्या घरात त्याची हत्या केल्याचे उघडकीस आले.
सहाय्यक पोलिस आयुक्त राजन भोगले यांनी याबाबत सांगितले की, वृषाल काळाणे या विकृत युवकाने ओंकारशी अनैसर्गिक कृत्य करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, ओंकारने त्याला विरोध केला. तरीही त्याने जबरदस्ती केल्याने ओंकार मोठ्याने ओरडायला लागला. त्यामुळे ओंकारचा आवाज बंद करण्यासाठी वृषाल काळाने या विकृताने त्याचे डोके फरशीवर आपटले. रक्त येऊ लागताच तो घाबरला व आपले बिंग फुटेल म्हणून त्याने ओंकारची हत्या केली. तसेच ओंकारचा मृतदेह घरातच कॉटखाली लपवून ठेवला. त्यावेळी त्याच्या घरी कोणी नव्हते. मात्र, आई-वडिल आल्यानंतर वृषालने याबाबत त्यांना माहिती दिली. त्यांनीही याची वाच्च्यता न करता वृषालला साथ दिली. ओंकारचा मृतदेह पोत्यात भरुन रात्रभर तसाच ठेवला आणि सकाळी बोपदेव घाटात फेकून दिला. अखेर आज ओंकारचा मृतदेह सापडला.