आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pune Crime Dairy, 3 Minor Girl Raped In 3 Incidents

पुण्यात वेगवेगळ्या घटनांत 3 अल्पवयीन मुलींवर बलात्कार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- पुणे शहरात वेगवेगळ्या घटनांत तीन अल्पवयीन मुलींवर बलात्कार झाल्याचे गुरुवारी उघडकीस आले. याप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून त्यांच्याविरोधात बलात्कार लैंगिक बाल संरक्षण अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पहिल्या घटनेत हवेली येथे एका चार वर्षांच्या मुलीला खेळायला नेण्याचा बहाणा करून राजेंद्र कोंडीबा उमाप याने मुलीला एका बांधकाम साइटवर नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक करून त्याच्याविरोधात हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

दुसऱ्या घटनेत येरवडा येथील मुलींच्या निरीक्षणगृहात आजीसोबत राहत असलेल्या एका 12 वर्षांच्या मुलीशी शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याने अमीर दामू चव्हाण या आरोपीला विमानतळ पोलिसांनी अटक केली आहे.
तिसऱ्या घटनेत पुण्यातील मंगळवार पेठेत राहणाऱ्या करण लोखंडे या तरुणाने एका 17 वर्षाच्या मुलीसोबत वेळोवेळी शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याने त्याच्याविरोधात दत्तवाडी पोलिस ठाण्यात आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.