आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणे: बँकेत नोकरीला असलेल्या तरुणाने अंगावर पेट्रोल ओतून जाळून घेतले!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- पुण्यातील गजबजलेल्या फर्ग्युसन रस्त्यावर एका तरुणाने पेट्रोल अंगावर ओतून जाळून घेतल्याची घटना शुक्रवारी घडली. नीरजकुमार सिंग असे तरुणाचे नाव असून तो या घटनेत 60 टक्के भाजला असून त्याच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
नीरजकुमार सिंग हा बिहारच्या भागलपूर येथील रहिवासी आहे. फर्ग्युसन रस्त्यावरील ओरिएंटल बँक आँफ कॉमर्स येथील पार्किंगमध्ये तो शुक्रवारी दुपारी एक पेट्रोलची बाटली घेऊन आला. या वेळी त्याने एका कारच्या मागे बसून अंगावर पेट्रोल ओतून पेटवून घेतले. त्यानंतर तो जागेवरच कोसळला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी त्याला रुग्णालयात दाखल केले. नीरजकुमार हा ओरिएंटल बँकेत कार्यरत होता. गेल्या दीड वर्षापासून तो मानसिक आजाराने त्रस्त असल्याचे त्याच्या कुटुंबीयांनी सांगितले.