आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यात एक कोटी रुपयांचे सर्पविष जप्त, कोल्हापूरचे दोघे अटकेत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- सिंहगड रोड परिसरातील जयदेवनगर येथे सापाचे विष विक्री करण्यासाठी आलेल्या दोघांना दत्तवाडी पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातून अर्धा लिटर सर्पविष जप्त करण्यात आले असून त्याची बाजारातील किंमत सुमारे एक कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते.

महेश सुरेश पाटील (रा. घोडकेनगर, इचलकरंजी) विजय राजाराम कुंभार (रा. हरळी खुर्द, ता. गडहिंग्लज, जि. कोल्हापूर) अशी आरोपींची नावे आहेत. हे दोघे सापाचे विष विक्री करण्यासाठी सिंहगड रस्ता येथे येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सदर दोघांना सापळा रचून अटक केल्याची माहिती पोलिस निरीक्षक (गुन्हे) स्मिता जाधव यांनी दिली. आरोपींविरोधात वन्यजीव अधिनियम कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक दत्ताजी मोहिते करत आहेत.
बातम्या आणखी आहेत...