आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणे: घटस्फोटित प्रेयसीचा चालत्या रिक्षातच केला खून

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- चारित्र्याच्या संशयावरून घटस्फोटित प्रेयसीचा चालत्या रिक्षातच गळा चिरून खून केल्याची घटना पुण्यात उघडकीस आली आहे. गुरुवारी रात्री साडेनऊच्या सुमारास वारजे माळवाडी परिसरात ही घटना घडली. याप्रकरणी वारजे पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. आरोपी पप्पू उर्फ भरत महादेव दुर्गे (वय 35 रा. सुतारदरा, कोथरुड) याला अटक करण्यात आली आहे.
रुपाली मरे उर्फ रुपाली तोंडे (वय 33, रा. सिंहगड रोड) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी रिक्षा चालक सोमनाथ शंकर ठाकर (वय 36, रा. गणेश कॉलनी, कोथरुड) यांनी तक्रार दिली आहे.
वारजे माळवाडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रूपाली मूळची मुळशी तालुक्यातील आहे. तिला दोन मुले आहेत. मात्र पतीसोबत पटत नसल्याने तिने त्याच्याशी फारकत घेत 8-10 वर्षापूर्वीच घटस्फोट घेतला होता. रूपालीची मुले पतीकडे राहतात. त्यामुळे उदरनिर्वाहासाठी रूपाली कोथरूड येथील स्विमिंग टॅंकवर काम करीत होती. दरम्यान, तिची ओळख रिक्षाचालक भरत दुर्गे याच्याशी झाली. तो रूपालीला ने-आण करायचा. यातून त्यांची मैत्री व पुढे प्रेमात रूपांतर झाले. गेल्या आठ वर्षापासून रूपालीचे दुर्गेसोबत प्रेमसंबंध होते. मात्र, मागील काही महिन्यांत दुर्गेच्या पत्नीला पतीच्या प्रेमसंबंधाबाबत माहिती मिळाली. त्यामुळे गेल्या महिन्यात त्याच्या पत्नीने रूपालीची भेट घेऊन त्याचा नाद सोड असे सांगितले.
यावर रूपालीने मी नाही तर तोच मला सोडत नसल्याचे सांगितले. मला परत याबाबत बोलू नको तुझ्या नव-याला आवर, तुझ्यासारखे मला 56 लोक मिळतील अशी रूपाली बोलली. त्यामुळे दुर्गे व त्याच्या पत्नीची यावरून घरी भांडणे झाली. रूपालीसोबतही दुर्गेचे भांडण झाले. दरम्यान, रूपालीच्या दुस-या कोणाबरोबर तरी अनैतिक संबंध असल्यानेच ती अशी बोलत आहे असा संशय दुर्गेला आला. त्यामुळे गेल्या महिन्यापासून रूपालीचा काटा काढण्याचे त्याच्या डोक्यात घोळत होते.
अखेर गुरुवारी रात्री दुर्गेने रूपालीला एका हॉटेलमध्ये बोलवून घेतले. तेथे दोघेही दारू प्यायले. रात्री साडेनऊच्या सुमारास ते वनाज कॉर्नर येथे ठाकर यांच्या रिक्षात बसले. त्यावेळी त्यांच्यात भांडण सुरु होते. त्यामुळे ठकार याने या दोघांना रिक्षातून खाली उतरण्यास सांगितले. मात्र, रात्रीची वेळ आहे अशी विनंती दुर्गेने केल्याने ठकार यांनी रिक्षा चालवण्यास पुन्हा सुरुवात केली. मात्र, थोड्याच वेळात हे दोघेही अचानक कसे शांत झाले म्हणून मागे पाहिले तर रूपालीचा गळा दुर्गेने कापला होता.
दुर्गेने रिक्षा रूग्णालयात नेण्यास सांगितले मात्र ठकार यांनी थेट पोलिसांत रिक्षा नेली. त्यानंतर पोलिसांनी रूपालीला दवाखान्यात नेले मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. दुर्गेने रूपालीच्या हत्येची कबुली दिली. रूपालीचे दुस-या व्यक्तीसोबत अनैतिक संबंध असल्यावरून भांडण झाले व रागाच्या भरात तिचा खून केला अशी कबुली दुर्गेनी दिली आहे.
पुढे वाचा, प्रियकराने लग्नास नकार दिल्याने युवतीची आत्महत्या...
बातम्या आणखी आहेत...