पुणे- आंघोळ करताना एका विवाहित महिलेचा अश्लिल व्हिडिओ शूट केल्याप्रकरणी पुणे पोलिसांनी एका पोलिस कर्मचा-याला अटक केली आहे. सोमवारी सकाळी चतुश्रुंगी परिसरात हा प्रकार घडला. याबाबत एका 30 वर्षीय महिलेने चतुश्रुंगी पोलिसात तक्रार दाखल केली आहे.
समीर पटेल असे अटक केलेल्या पोलिस कर्मचा-याचे नाव आहे. या प्रकरणात आणखी तिघांविरोधात महिलेने तक्रार केली आहे. मात्र ते फरार झाले आहेत.
सकाळी आंघोळ करत असताना समीर हा संबंधित महिलेचा चोरून मोबाईलमध्ये व्हिडिओ शूट करत होता. काही वेळाने हा प्रकार महिलेच्या लक्षात आला. त्यानंतर तिने तत्काळ पोलिसांत धाव घेतली. पोलिसांनी आरोपी समीर पटेलला लागलीच अटक केली.