आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पुणे: Matrimonial Site वरून गंडा घालणारे बंटी- बबली जेरबंद, 10 जणांना लाखोंना लुटले

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- विवाहविषयक संकेतस्थळाच्या माध्यमातून तरुणांना जाळ्यात अाेढून लग्नाचे अामिष दाखवत फसवणूक करणाऱ्या बंटी-बबलीला पुणे पोलिसांनी नागपुरातून अटक केली आहे. त्यांनी राज्यभरातील ते 10 जणांची फसवणूक केल्याचे चौकशीत उघड झाले आहे. किशाेर चुडामण रामटेककर (34) त्याची पत्नी रिंकी ऊर्फ कामिनी किशाेर रामटेककर (28, दाेघे रा.विद्यानगर वाठाेडी, नागपूर) असे या आरोपी जोडप्याचे नाव आहे. 

 

पुण्यातील सिंहगड राेड येथील 31 वर्षीय अायटी इंजिनिअरचा घटस्फाेट झाल्याने त्याने पुनर्विवाहासाठी ब्राह्मण, देशस्थ, डायव्हाेसी मेट्राेमाेनी संकेतस्थळांवर नाव नाेंदविले हाेते. त्या माध्यमातून पल्लवी असलकर नामक मुलीने पीडित इंजिनिअरला प्रस्ताव पाठवला. त्यानंतर दोघांत फोन, व्हॉटसअॅपच्या माध्यमातून संवाद सुरू झाला. अापण झारखंडच्या रायगडमध्ये पीडब्ल्यूडी खात्यात नोकरीस असून वडिलांचा बांधकाम व्यवसाय असल्याचे सांगून पल्लवीने पीडिताचा विश्वास संपादन केला. 

 

दरम्यान, वडिलांना हृदयविकाराचा झटका आल्याचे सांगत पल्लवीने पीडिताकडे पैशाची मागणी केली. त्यामुळे त्याने पल्लवीच्या वेगवेगळ्या खात्यांवर सुमारे 1 लाख 15 हजार रुपये टाकले. दरम्यान, वडिलांचे निधन झाल्याचे सांगून पल्लवीने संपर्क तोडला. नंतर त्याने छत्तीसगडमध्ये जाऊन चौकशी केली. मात्र, पल्लवी नामक व्यक्तीच तिथे कार्यरत नसल्याचे उघड झाले. अशाचप्रकारे त्याची फसवणूक झाली. 

बातम्या आणखी आहेत...