आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यात एकाच रात्री जळीतकांडाच्या दोन घटना; 6 ट्रक, 6 दुचाक्या जाळल्या!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- दुचाकी व चारचाकी जाळून टाकण्याच्या घटनेने पुणे पुन्हा एकदा हादरले आहे. गुरुवारी पुण्यात एकाच रात्रीत दोन वेगवेगळ्या ठिकाणी वाहने जाळण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पुण्यातील मध्यवस्तीतील भाग शुक्रवार पेठेत 6 दुचाकी जाळल्या तर वाघोलीतील एका टॅक गॅरेजमध्ये लावलेले 6 ट्रक जाळून टाकण्यात आल्याची घटना समोर आली आहे.
शुक्रवार पेठेत जाळण्यात आलेल्या 6 दुचाकी रात्री साडेतीनच्या सुमारास पेटल्याचे लक्षात आले. हे जळीतकांड पोलिस चौकीसमोरच झाले आहे. आग लागली की लावली गेली हे अद्याप समोर आलेले नाही. तर दुस-या घटनेत वाघोलीत सहा ट्रक जळून खाक झाले. वाघोली परिसरातील एका बाबूभाई गॅरजेमधील सहा ट्रक दुरुस्तीसाठी आणण्यात आले होते. मात्र, शुक्रवारी पहाटे हे ट्रक आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याचे लक्षात आले. यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी 3 ते 4 गाड्यांच्या मदतीने ही आग आटोक्यात आणली. मात्र, तोपर्यंत ट्रक खाक झाले होते. ट्रकला लागलेल्या आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.
मागील महिन्या-दीड महिन्याच्या कालावधीत पुण्यात 5-6 वेळा जळीतकांड घडलेली आहेत. यात 50 हून अधिक दुचाकी तर 10 हून चारचाकी जाळल्या आहेत. आता पुन्हा एकदा एकाच रात्रीत दोन वेगवेगळ्या ठिकाणी जळीतकांड घडल्याने पुणेकरांत दहशत निर्माण झाली आहे.
नाशकात 5 खासगी बसेस जाळल्या-
नाशिकमध्ये आडगाव नाका परिसरात उभ्या असलेल्या पाच खासगी बसेसना आग लावण्यात आली. या आगीत बसेसचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. आगीचे कारण समजू शकले नाही. नाशिकच्या आडगाव पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्याप्रमाणाचे नाशिकमध्येही वाहने जळीतकांड सुरु आहे. सिडकोमध्ये वाहनांना लावण्यात आलेल्या आगीची घटना ताजी असताना गुरुवारी सकाळी आडगाव नाका परिसरात उभ्या करण्यात आलेल्या पाच खासगी बस जळून खाक झाल्या. नाशिकमध्ये खासगी बसेसना आग लावण्याची ही पहिलीच घटना आहे.
छायाचित्रांतून पाहा हे जळीत कांड...