आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणे: इंदापूरात शेतमजूराला पोलिसांसमक्ष जिवंत जाळण्याचा प्रयत्न

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बारामती- पोलिस बंदोबस्तात जमिनीची मोजणी सुरू असताना जमीन मालक खरेदी करणारा जिल्हा परिषद सदस्य यांच्या अंगावर रॉकेल ओतून या दोघांना जमावाने जिवंत जाळण्याचा प्रयत्न सोमवारी इंदापूर तालुक्यातील लाखेवाडी गावात झाला.

लाखेवाडी येथील नागेश मारुती भिसे यांनी पडीक जमिनीचा काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य श्रीमंत ढोले यांना विक्री करण्याचा व्यवहार केला आहे. भिसे यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, 'या जमिनीवर थोरवे कुटुंबीयांनी अतिक्रमण केले आहे. मी खरेदीखत केल्यानंतर सोमवारी पोलिस बंदोबस्तात शेतजमीन मोजून अतिक्रमण दूर करण्यास सुरुवात झाली होती. मात्र याच वेळी थोरवे यांच्या 25 ते 30 गुंडांनी माझ्यावर ढोले यांच्यावर काठ्या-कुऱ्हाडीने हल्ला चढवला. आम्ही दोघेही पळून जात असताना या गुंडांनी आमच्या अंगावर रॉकेल ओतून आम्हाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला.'
दरम्यान, या वेळी उपस्थित पोलिस फक्त बघ्याची भूमिका घेत होते, असा आरोप ढोले यांनी केला आहे. पोलिस ठाण्यात तक्रार करुनही अॅट्रॉसिटीनुसार गुन्हा दाखल करण्यास पोलिसांनी नकार दिला, अशी तक्रार भिसे यांनी केली आहे. तर चौकशीत तथ्य आढळल्यास योग्य कारवाई करु, असे पोलिस उपअधीक्षक बापू बांगर म्हणाले.
बातम्या आणखी आहेत...