आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पुणे: सासवडमध्ये अल्पवयीन मुलीवर चौघांचा आळीपाळीने बलात्कार, आरोपींना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- पुण्याजवळील सासवड (ता. पुरंदर) येथे एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर मागील आठवड्यात चौघांनी सामूहिक बलात्कार केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे. संबंधित मुलगी आणि तिच्या पालकांनी सासवड पोलिस ठाण्यात धाव घेतल्यानंतर ही घटना समोर आली आहे.

 

या प्रकरणी रोहन जाधव, आदेश चौरे, संतोष माकर आणि अजय खोमणे अशी अटक केलेल्या चार आरोपींची नावे आहेत. 

 

याबाबतची माहिती अशी की, पीडित मुलगी शनिवारी (18 नोव्हेंबर) दुपारी सासवडमधील पालखी तळावर गेली होती. त्यावेळी रोहन जाधव (रा. सासवड) याने तेथील परिसरात बलात्कार केला. यानंतर रोहन जाधवचे मित्र संतोष माकर आणि आदेश चौरे यांनी पीडित मुलीला तेथून जेजुरीतील एका लॉजवर नेऊन आळीपाळीने बलात्कार केला. यानंतर या दोघांनी त्यांच्या आणखी एका अजय खोमणे नावाच्या मित्राच्या पीडित मुलीला स्वाधीन केले. खोमणेने या मुलीला वाघापूर येथील एका लॉजवर नेऊन बलात्कार केला, अशी तक्रार संबंधित मुलीने व तिच्या पालकांनी केली आहे. याबाबत सासवड पोलिस ठाण्यात रीतसर लेखी तक्रार दाखल केली आहे.

 

या घटनेनंतर सासवड पोलिसांनी या चौघांना ताब्यात घेतले सोबतच मुलीची वैद्यकीय तपासणी केली. यात पीडितेवर बलात्कार झाल्याचे स्पष्ट झाले. यानंतर पोलिसांनी वरील चारही आरोपींना अटक केली आहे. पुढील तपास सासवड पोलिस करत आहेत. 

बातम्या आणखी आहेत...