आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणे: पत्नीच्या बाहेरख्याली वागण्याला व प्रेमसंबंधाला वैतागून पतीची आत्महत्या

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- आपल्या पत्नीचे परपुरूषाशी संबंध असल्याने व पत्नीला सांगूनही ती ऐकत नसल्याने वैतागून पतीचे गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना पुण्यातील खडकी भागात उघडकीस आली आहे. याप्रकरणी पत्नी व तिच्या प्रियकरावर आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
याबाबतची माहिती अशी की, संबंधित पती-पत्नी खडकीत राहतात. पत्नीचे बाहेरख्याली वागणे पतीला पसंत नव्हते. याबाबत त्याने पत्नीला वारंवार सूचना देऊनही ती ऐकत नव्हती. पत्नीला सांगून पतीसमोरच प्रियकरास फोनवर तासनतास बोलत बसायची. यामुळे पतीला त्रास व्हायचा. अखेर पत्नीच्या अफेयरला वैतागून पतीने गळफास घेऊन आत्महत्या केली. शनिवारी (11 नोव्हेंबर) रात्री खडकीतील राजा बंगल्याजवळील एका झाडाला गळफास घेत आपले जीवन संपविले. याप्रकरणी खडकी पोलिसांनी पत्नीसह तिच्या प्रियकरावर गुन्हा दाखल केला आहे.
बातम्या आणखी आहेत...