आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pune Crime Dairy, Police Arrested Pune's Criminal Gajja Marane At New Mumbai

पुण्यातील कुख्यात गुंड गजा मारणे याला मुंबईत अटक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- घायवळ टोळीतील गुंडाच्या हत्या प्रकरणात फरार असलेला पुण्यातील कुख्यात गुंड गजानन पंढरीनाथ मारणे त्याचा सहकारी रूपेश कृष्णराव मारणे यांना नवी मुंबईतील कामोठेतील व्यंकट हॉटेल येथून अटक करण्यात आली आहे. या वेळी त्यांच्याकडून दोन कोयते जप्त करण्यात आले आहेत. दरम्यान, दोघांना न्यायालयात हजर केले त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

पुणे शहर ग्रामीण परिसरात गजा मारणे नीलेश घायवळ टोळीत गेल्या काही दिवसांपासून जमीन खरेदी-विक्रीतील वर्चस्व पूर्वीच्या खुनांच्या घटनातून वाद सुरू आहे. यातूनच दोन आठवड्यापूर्वी मारणे टोळीने घायवळ टोळीतील अमोल बधे याची हत्या केली. त्यापूर्वी मुळशी तालुक्यात घायवळ टोळीचा सदस्य संतोष गावडे याचीही निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. या दोन्ही गुन्ह्यात गजा मारणे मुख्य सूत्रधार असल्याचा जबाब प्रत्यक्षदर्शीने पोलिसांना दिला आहे.
पोलिसांच्या भूमिकेवर संशय- गजा मारणे हा दोन खून करून पसार झाल्यानंतरही त्याचा शोध पोलिसांना लागत नव्हता. कामोठी पोलिसांनी मारणे हा राजस्थानला पळून जात असताना त्याला नवी मुंबर्इत अटक केल्याचे सांगितले जात आहे. प्रत्यक्षात तपास अधिकारी पी. के. सोनवणे हे पूर्वी गजा मारणे राहत असलेल्या परिसरातील कोथरूड पोलिस ठाण्यात कार्यरत होते. त्यामुळे पोलिसांशी संपर्क साधून आरोपी हजर झाल्याची चर्चा असून या घटनेत पोलिसांची भूमिका संशयास्पद आहे.