आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणे: 16 वर्षाच्या मुलीचे अपहरण करून बलात्कार करणा-या तरूणाला 10 वर्षाची सक्तमजूरी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- एका शालेय मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार केल्याप्रकरणी एका तरूणाला दहा वर्षाची सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे. ही घटना 2013 मधील आहेत. अगुस्टाईन (वय-28, पश्चिम बंगाल) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. अगुस्टाईनने 16 वर्षीय मुलीला फूस लावून मित्राच्या रूमवर नेऊन तिच्यावर बलात्कार केला होता. याप्रकरणी तिच्या आईने पोलिसांत तक्रार दाखल केली होती.
 
याबाबतची माहिती अशी की, संबंधित पीडीत मुलगी त्यावेळी 16 वर्षाची होती व इयत्ता दहावीत एका शाळेत शिकत होती. तिला वडिल नाहीत त्यामुळे ती आई व लहान भावासोबत राहत होती. पैशाची गरज म्हणून संबंधित मुलगी मुंढव्यातील एका हॉटेलात साफसफाईचे काम करत होती. त्याच हॉटेलात अगुस्टाईन मेन कुक म्हणून काम करत होता. 
 
एके दिवशी अगुस्टाईनने मुलीचे अपहरण करून तिला मित्राच्या रूमवर नेले व तेथे तिच्यावर बलात्कार केला. मात्र, घटनेनंतर मुलीच्या पोटात दुखू लागल्याने घडलेला प्रकार समोर आला. यानंतर मुलीच्या आईने येरवडा पोलिस ठाण्यात अगुस्टाईनविरोधात अपहरण करून बलात्कार केल्याचा व धमकी दिल्याचा गुन्हा दाखल केला होता. आता या खटल्यात त्याला दहा वर्षाची शिक्षा झाली आहे. 
 
बातम्या आणखी आहेत...