आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्जबाजारी झाल्याने आई, पत्नी, मुलीची हत्या, आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - कर्जबाजारीपणाला कंटाळून एकाने पत्नी, मुलगी आणि आईची गळा दाबून हत्या केल्याची घटना पुण्यात बुधवारी उघडकीस आली. तिघींची हत्या केल्यानंतर आरोपीने स्वत:ही आत्महत्येचा प्रयत्न केला. सागर माधव गायकवाड असे आरोपीचे नाव असून तो स्वत:हून पोलिसांत हजर झाला.
पत्नी कविता (34), मुलगी इशिता (7) आणि आई शकुंतला गायकवाड (58) अशी मृतांची नावे आहेत. सागर आई, पत्नी व मुलीसह एसएलके हाइट्स सोसायटीत राहतो. तो शेअर ब्रोकर असून गेल्या काही महिन्यांपासून तो कर्जबाजारी झाला होता. त्यामुळे त्याला नैराश्याने ग्रासले होते. मंगळवारी त्याने आई, पत्नी व मुलीला खाद्यपदार्थातून झोपेच्या गोळ्या दिल्या. त्यानंतर त्याने तिघींचीही गळा दाबून हत्या केली.
गाडीसाठी घेतले कर्ज
सागरची पत्नी कविता ही शिक्षिका होती, तर मुलगी इशिता दुसरीत शिकत होती. पाच वर्षांपूर्वी तो इन्फोसिसमध्ये त्यानंतर ग्लोबल सर्व्हिस बीपीओत नोकरीला होता. दोन वर्षांपूर्वी त्याने शेअर ब्रोकरचा व्यवसाय सुरूकेला. मात्र, धंद्यात त्याला अपयश आल्याने तो कर्जबाजारी झाला. दरम्यानच्या काळात त्याने होंडा जेझ गाडी घेण्यासाठी इचलकरंजी बँकेचे सहा लाखांचे कर्ज घेतले होते. तसेच हडपसर येथील एका सावकाराकडून 1 लाख 90 हजार रुपयांचे 15 टक्के व्याजाने कर्ज घेतले होते.