आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मौजमजा करण्यासाठी शाळकरी मुलांनी चोरल्या नऊ दुचाकी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - माैजमजा करण्यासाठी तसेच शाळेत मित्रांसमाेर एेट मिरवण्यासाठी तब्बल नऊ दुचाकींची चाेरी करणाऱ्या दाेन अल्पवयीन मुलांना पाेलिसांनी अटक केली आहे. दोन्ही मुलांनी दत्तवाडी, खडक, फरासखाना, सहकारनगर भागातील दुचाकी चाेरल्या असून पाेलिसांनी त्या जप्त केल्या अाहेत. चोरीची दुचाकी विक्री करण्यासाठी दोन मुले गजानन महाराज चौकात येणार असल्याची माहिती पोलिसांना एका खबऱ्याकडून मिळाली. त्यानुसार सापळा रचून पोलिसांनी त्यांना अटक केली. त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता वेगवेगळ्या भागांतून दुचाकी चोरल्याची कबुली त्यांनी दिली.
बातम्या आणखी आहेत...