आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणे : तडीपारी मागे घेण्यासाठी पत्रकाराने पेटवून घेतले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - खंडणीचा गुन्हा दाखल झालेल्या पुण्यातील कोंढवा भागातील एका वृत्तपत्राचा संपादक रुबेन सॅम्युअर मॅन्युअल (वय ४०) यास पोलिसांनी तडीपार करण्याबाबत नोटीस बजावली होती. त्याविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करत असलेल्‍या रुबेन याने गुरुवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास स्वत:ला पेटवून घेत आत्‍महत्‍येचा प्रयत्‍न केला. यात रुबेन ५० टक्के भाजलेला असून त्यास उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बंडगार्डन पोलिस ठाण्यात त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

रुबेन याच्यावर यापूर्वी वानवडी, कोंढवा व लष्‍कर पोलिस ठाण्‍यात चार गुन्हे दाखल आहेत. खंडणी प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर वानवडी पोलिसांनीही त्याला तडीपारीची नोटीस बजावली होती. मात्र सदर कारवार्इ मागे घ्यावी, अशी मागणी करत गेल्या तीन- चार दिवसांपासून तो पोलिस आयुक्‍त कार्यालयाचे उंबरठे झिजवत होता. तसेच आपल्‍याविरोधात खोटे गुन्हे दाखल केले असून तडीपारीची कारवाई रद्द करावी, अशी मागणीही त्याने लष्कर विभागाचे सहायक पोलिस आयुक्‍तांकडे एका अर्जाद्वारे केली होती. गुरुवारी याच मागणीसाठी तो जिल्‍हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करत होता. मात्र अचानकपणे त्याने स्वत:च्या अंगावर पेट्रोल ओतून पेटवून घेतले. पोलिसांनी प्रसंगावधान राखत तातडीने त्यास त्यानंतर ससून रुग्णालय येथे उपचाराकरिता हलविले.