आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दाेन महिन्यांच्या बाळाच्या अपहरणाचा अाईकडूनच बनाव, १२ तासांत पर्दाफाश

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - एका महिलेने अापल्या दाेन महिन्यांच्या बाळाचे अपहरण झाल्याची तक्रार पाेलिसांत दिली हाेती. मात्र अधिक चाैकशीअंती मुलाच्या अाईनेच पाेटचा गाेळा अापल्या बहिणीकडे तिच्या वंशाचा दिवा म्हणून दिल्याचे व अपहरणाचा बनाव रचल्याचे उघड झाले अाहे. पाेलिसांनी १२ तासांत हा प्रकरणाचा पर्दाफाश केला. अाैरंगाबाद येथून सदर महिलेकडून बाळाला ताब्यात घेण्यात अाले अाहे.

काेथरूड परिसरात राहणारी एक महिला गुरुवारी अापल्या दाेन महिन्यांच्या बाळाला साेबत घेऊन माेठ्या मुलाला शाळेत साेडण्यासाठी गेली हाेती. ‘शाळेतून घरी येत असताना एका पांढऱ्या रंगाच्या अाेम्नी कारमधून अालेल्या काही लाेकांनी जबरदस्तीने अापल्या हातातून छाेट्या बाळास पळवून नेले,’ अशी तक्रार सदर महिलेने काेथरूड पाेलिस ठाण्यात दाखल केली हाेती. या घटनेची माहिती कळताच अपर पाेलिस अायुक्त सी.एच.वाकडे, पाेलिस उपअायुक्त पी.अार.पाटील व सहा.पाेलिस अायुक्त राजेंद्र जाेशी यांनी या प्रकरणाचा तपास खंडणी विराेधी पथकाकडे साेपवला. त्यानुसार सदर पथकाने चाैकशी सुरू केली. मात्र अपहृत मुलाची अाई, वडील व इतर नातेवाइकांकडून माहिती घेतली असता त्यांच्या बाेलण्यात तफावत अाढळून अाली. तसेच अपहृत मुलाची अाई अापली बहीण २५ नाेव्हेंबर राेजी पुण्यात येऊन गेल्याचे पाेलिसांपासून लपवत असल्याचे पथकाच्या लक्षात अाले. त्यामुळे या प्रकरणात मावशीचा सहभाग असावा, असा संशय पाेलिसांना अाला व त्यादृष्टीने तपास केला असता खरा प्रकार उजेडात अाला.
पुढील स्‍लाइड्सवर वाचा, पाेटचा गाेळा विकल्याचा संशय..,त्रयस्ताकडेच ठेवले बाळ..