आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मनपात नोकरीचे आमिष दाखवून दीड लाखाला गंडा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - पुणे महानगरपालिकेत ज्युनियर स्टाफ नर्स म्हणून नोकरीस लावण्याचे आमिष दाखवून दोन भामट्यांनी एका महिलेला दीड लाखास गंडा घातल्याची घटना पुण्यात उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी सीमा मुक्ताजी नितनवरे व प्रशांत पवार या दोन आरोपींविरोधात येरवडा पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत श्रीनिवास जगदीश कुलकर्णी (रा. सातारा) यांनी पोलिसांकडे फिर्याद दाखल केली आहे. श्रीनिवास यांची पत्नी शुभांगी हिला पुणे मनपात नोकरी लावण्याचे आमिष सीमा व पवार यांनी दाखवले. त्यासाठी तिच्याकडून दीड लाख रुपये घेऊन तिला मनपाच्या नावे नियुक्तीची खोटी कागदपत्रे देऊन शुभांगीस नोकरीस न लावता तिची फसवणूक केली. याप्रकरणी सहायक पोलिस निरीक्षक डी. पी. चव्हाण पुढील तपास करत आहेत.