पुणे- पुण्यातील एका सोसायटीत दोन महिन्यांची कुत्र्याची पिल्ले घेऊन जाण्यास विरोध केल्यामुळे 20 वर्षीय तरुणी व तिच्या आईला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या मारहाणीच्या घटनेचा व्हिडीयो समोर आला आहे. मारहाण करणा-या तरुणाने युवतीला जीवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. ‘तू कोणाला फोन करते. मी माझ्या लोकांना बोलावतो. ते तुला कुठे कापून फेकून देतील हे सुद्धा कळणार नाही‘ अशी धमकी काळे याने दिली. निघून जाताना तो अंगावर थुंकून गेला असे फिर्यादीत म्हटले आहे.
काय आहे प्रकरण..
- तक्रारदार तरुणी सेजल सराफ व आरोपी मिलिंद काळे हे कोथरुडच्या उच्चभ्रू महात्मा सोसायटीत राहतात.
- सेजल सराफ व तिच्या आईने रस्त्यावरील कुत्र्यांच्या 3 पिल्लांना घरात आश्रय दिला होता.
- शेजारी राहणाऱ्या मिलिंद काळे यांना या कुत्र्यांच्या पिल्लांचा त्रास होत होता.
- काळे यांनी कुत्र्यांची पिल्ले घेऊन जाण्यासाठी महापालिकेची गाडी बोलावली होती.
- ही पिल्ले दोन महिन्यांची असल्याने सेजल आणि तिच्या आईने घेऊन जाण्यास विरोध केला.
- या विरोधामुळे काळे यांचा पारा चांगलाच भडकला.
- चिडलेल्या मिलिंद काळेंनी सेजल आणि तिच्या आईला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
- या मारहाणीत सेजलचा दात पडल्याची माहिती आहे.
- सेजलने कोथरुड पोलिस स्टेशनमध्ये मिलिंद काळेंविरोधात तक्रार नोंदवली आहे.
- पोलिसांनी गुन्हा दाखल करुन काळेला अटक केली आहे.
- ही घटना कोथरूड येथील आकाशदर्शन, महात्मा सोसायटीमध्ये घडली.
- ही घटना रविवारी घडल्याची माहिती वरिष्ठ निरीक्षक एन. एस. भोसले पाटील यांनी दिली.
- सेजल सराफ या ‘अॅनिमल वेल्फेअर‘ या प्राणिमित्र संघटनेसाठी काम करतात.
- सेजल सध्या बी.कॉम.च्या द्वितीय वर्षात शिकत आहेत.
- काळे यांनी केलेल्या मारहाणीत सेजल व त्यांच्या आई जखमी झाल्या आहेत.
- सेजल यांच्या आईला काळे यांनी बुटाने मारहाण केली.