आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुत्र्यांच्या सांभाळावरून मायलेकींना मारहाण; अाराेपीला पाेलिस काेठडी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - काेथरूड परिसरातील उच्चभ्रू भागातील महात्मा साेसायटीतील भटक्या कुत्र्यांना महापालिकेचे कर्मचारी घेऊन जात असताना त्यांना विराेध करणाऱ्या मायलेकींना एकाने मारहाण केली. मिलिंद काळे (रा. काेथरूड,पुणे) असे अाराेपीचे नाव असून पाेलिसांनी त्याला अटक केली अाहे. साेसायटीच्या सीसीटीव्हीत ही मारहाण कैद झाली अाहे.
याबाबत सेजल सराफ या २० वर्षीय तरुणीने पाेलिसांकडे िफर्याद िदली अाहे. महात्मा साेसायटी येथे भटक्या कुत्रीने दाेन महिन्यांपूर्वी चार पिल्लांना जन्म िदला हाेता काही दिवसांनी त्या कुत्रीचा मृत्यू झाला. त्यानंतर त्या िपल्लांचे संगाेपन सेजल ितची अार्इ साेनाली सराफ या करीत हाेत्या. दुसरीकडे साेसायटीच्या अावारात या भटक्या कुत्र्यांना काही जण विराेध करत हाेते. काही दिवसांपूर्वी याच कारणावरून याच साेसायटीतील रहिवासी मिलिंद काळे सराफ मायलेकींचा वाद झाला हाेता. रविवारी काळे यांनी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना बाेलावून ही भटकी कुत्री घेऊन जाण्यास सांगितले. मात्र ही पिले पाेरकी खूपच लहान असल्यामुळे त्यांना पालिकेने उचलून नेऊ नये, त्यांचे संगाेपन करणे अावश्यक अाहे, असे मानवतेचे कारण देत सराफ यांनी पालिका कर्मचाऱ्यांना विराेध केला. मात्र या प्रकारामुळे तक्रारदार काळे संतापले. त्यांनी सेजल तिच्या अाईसाेबत इमारतीच्या प्रवेशद्वारावरच भांडण करून त्यांना शिवीगाळ मारहाणही केली. या प्रकरणी काळेविराेधात पाेलिसांनी गुन्हा दाखल करून त्याला अटक केली अाहे. दरम्यान, न्यायालयाने अाराेपी काळेला एक दिवसाची पाेलिस काेठडी सुनावली अाहे.
बातम्या आणखी आहेत...