आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणे : कोथरुडमध्ये पहाटे कामावर निघालेल्या महिलेचा खून, डोक्यात धारदार शस्त्राने वार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - काेथरूड परिसरातून मंगळवारी पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरून जात असलेल्या एका महिलेचा डाेक्यात धारदार शस्त्राने वार करून तिचा निर्घृण खून करण्यात अाला. सिटी प्राइड टाॅकीजजवळील केतन हाइटस बिल्डींगसमाेरील रस्त्यावर ही दुर्घटना घडली.
शुभांगी प्रकाश खाटावकर (३१) असे खून झालेल्या महिलेचे नाव अाहे. शुभांगीचा पती प्रकाश मधुकर खाटावकर यांच्या फिर्यादीवरून पाेलिसांनी या प्रकरणी विश्वास बापू कळेकर (४०, रा. काेथरूड, पुणे) या अाराेपीविराेधात खुनाचा गुन्हा दाखल केला अाहे. विश्वास कळेकर हा शुभांगीशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करीत हाेता. मात्र तिने नकार दिला हाेता. तसेच हा प्रकार कळाल्यानंतर शुभागींचा पती प्रकाशनेही याबाबत विश्वासला समज दिली हाेती. त्यामुळे ताे चिडलेला हाेता. शुभांगी ही काेथरूड परिसरात काही घरांमध्ये घरकाम करीत हाेती. नेहमीप्रमाणे ती मंगळवारी सकाळी केतन हाइटस इमारतीसमाेरून दुचाकीवर कामास जात हाेती. त्याचवेळी विश्वासने मानेवर व डाेक्यावर धारदार शस्त्राने वार करून शुभांगीला गंभीर जखमी केले. यातच तिचा मृत्यू झाला. या घटनेनंतर शुभांगीची दुचाकी व माेबाइलमधील कार्ड घेऊन अाराेपीने पळ काढला.
बातम्या आणखी आहेत...