आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यात सशस्त्र दरोडा;एकाच कुटुंबातील तिघांचा दराेडेखाेरांकडून निर्घृण खून

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- पुणे जिल्ह्यातील धामणे (ता. वडगाव मावळ) गावात मंगळवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास सशस्त्र दराेडेखाेरांनी एका घरावर दराेडा टाकला. या वेळी दराेडेखाेरांनी या कुटुंबातील महिला-पुरुषांना बेदम मारहाण केली, त्यात तीन जणांचा मृत्यू झाला असून दाेन जण गंभीर जखमी झाले अाहे. मृतांमध्ये या कुटुंबातील अाई, वडील व एका मुलाचा समावेश अाहे.  
 
नथू विठाेबा फाले (वय ६५), छबाबाई नथू फाले (६०) व अत्रीनंदन तथा अाबा नथू फाले (३०) अशी मृतांची नावे अाहेत. हल्लेखाेरांनी डाेक्यात टिकावचे घाव घालून त्यांचा खून केल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. तर अाबा फाले याची पत्नी तेजश्री (२५) व मुलगी अंजली (६) या गंभीर जखमी झाल्या अाहेत. शेतकरी नथू फाले यांचे धामणे गावापासून जवळच असलेल्या शेतात घर अाहे. धार्मिक प्रवृत्तीचे नथू हे पंचक्राेशीतील हरिनाम सप्ताहात टाळकरी म्हणून सेवा देत असत. मंगळवारी पहाटे दराेडेखाेरांनी त्यांच्या घरावर दराेडा टाकला. मात्र त्यांना विराेध करणाऱ्या कुटुंबीयांना अाराेपींनी बेदम मारहाण केली. अक्षरश: टिकावचे घाव घालून तिघांचा खून करण्यात अाला. सदर घटनेची माहिती मिळताच तळेगाव दाभाडे पाेलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठविले.  या घटनेत गंभीर जखमी झालेल्या तेजश्री व अंजली फाले यांना साेमाटणे फाटा येथील खासगी रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात अाले अाहे. दराेडेखाेरांच्या हल्ल्यात फाले कुटुंबातील दाेन लहान मुली अनुष्का व ईश्वरी या सुदैवाने बचावल्या अाहेत.   
 
पुणे ग्रामीण पाेलिस अधीक्षक सुवेझ हक, अतिरिक्त पाेलिस अधीक्षक राजकुमार शिंदे, तळेगाव दाभाडे पाेलिस ठाण्याचे वरिष्ठ पाेलिस निरीक्षक मुगुट पाटील यांनी घटनास्थळी भेट देत परिस्थितीची पाहणी केली.
बातम्या आणखी आहेत...