आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माळीणवर निसर्ग कोपला : एकाच घरातील सात जण गाडले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
माळीण - माळीण गावातील सुलोचना बाळासाहेब ढिमसे या महिलेच्या घरात रविवारी दशक्रिया विधीचा कार्यक्रम होता. त्याकरिता काही नातेवाईक त्यांच्या घरी आले होते. बुधवारी सकाळी ही भीषण घटना घडली तेव्हा त्यांच्या घरातील केवळ दोन-तीन जणच बाहेर गेले होते, उर्वरित सात जण ढिगार्‍याखाली दबले गेले. सुलोचना ढिमसे यांना या ढिगार्‍याखालून काढण्यात यश आले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार केले जात आहेत.

वाहून गेलेल्यांचा शोध
डोंगराचा मोठा भाग कोसळल्यानंतर पाण्याचा मोठा लोंढा गावावर धडकला. मातीच्या ढिगार्‍यावरून जोरात पाणी वाहताना त्यासोबत माती, घरांचे अवशेष गावाच्या खालील भागात असलेल्या ओढय़ाच्या दिशेने वाहून गेले. या घटनेत पाण्याच्या लोंढय़ासोबत काही मृतदेहही वाहून गेले असावेत, अशी शंका उपस्थित केली जात आहे.

‘एनडीआरएफ’चे जवान व पोलिस पथक त्यांचा कसून शोध घेत आहेत. ओढय़ाचा संपूर्ण मार्ग पिंजून काढत मृतदेह कोठे आढळतात का, याची पाहणी केली असल्याची माहिती पुणे ग्रामीण पोलिस दलाचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक विजय मगर यांनी दिली.