आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Online ओळख, Offline फसवणूक, रेपचा आरोप, वाचा पुण्यातील इंजिनिअरची कहाणी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- मॅट्रिमोनिअल वेबसाईटवर पुणे महानगरपालिकेत काम करणाऱ्या इंजिनिअरने प्रोफाईल तयार केले होते. त्याचा वापर करुन 35 वर्षीय महिलेने बलात्काराचा आरोप करत फसवल्याची घटना उघडकीस आली आहे. 49 वर्षीय इंजिनिअरचे लग्न झाले असून त्याला एक मुलगीही आहे. विशेष म्हणजे आरोपांमुळे घाबरलेल्या अभियंत्याने महिलेला तब्बल 3 लाख रुपये दिल्याचे समोर आले आहे.
अशी घडली घटना, फोटोही पाठवले
- चतुरश्रुंगी पोलिस ठाण्यात या प्रकरणी फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- इंजिनिअरने मॅट्रिमोनिअल वेबसाईटवर आपले प्रोफाईल तयार केले होते. त्यानंतर 2005 मध्ये त्याचे लग्न झाले.
- दोघांना एक मुलगीही झाली. पण हे प्रोफाईल इंजिनिअरने डिलिट केले नव्हते.
- काही दिवसांपूर्वी मध्य प्रदेशातील एका महिलेने हे प्रोफाईल बघितले. तिने इंजिनिअरशी संपर्क साधला.
- इंजिनिअरनी सांगितले, की आता माझे लग्न झाले आहे. मला पुन्हा फोन करु नका.
- पण तरीही महिला या इंजिनिअरच्या मोबाईलवर फोन करत राहिली. तिने तिचे काही फोटोही मोबाईलवर पाठवले.
पुण्यात आली महिला, वारजेत भेटली
- त्यानंतर एक दिवस संबंधित महिला पुण्यात आली. तिने इंजिनिअरला फोन करुन बोलवून घेतले.
- १० सप्टेंबरला दोघे एक हॉटेलमध्ये भेटले. यावेळी तिने पैशांची मागणी केली.
- या महिलेला एक मुलगी आहे. तिच्या शिक्षणासाठी पैसे हवे असल्याचे तिने सांगितले.
- तिने पाच लाखांची मागणी केली. त्यानंतर मी कधीही फोन करणार नाही असे सांगितले.
- पण इंजिनिअरकडे एवढे पैसे नव्हते. त्याने रोख 15 हजार रुपये आणि ६ ग्रॅमची गळ्यातील सोनसाखळी दिली.
- पण त्यानंतरही तिचा फोन बंद झाला नाही. तिने 15 सप्टेंबर रोजी पुन्हा फोन केला.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणून घ्या.... त्यानंतर काय झाले... या महिलेने काय केले....
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...