आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pune Faraskhana Police Station Parking Blast 2014, 4 Simi's Youth Arrested

पुणे: फरासखाना स्फोटप्रकरणी 4 दहशतवाद्यांना अटक, आंध्रात कारवाई

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- पुण्यातील मध्यवस्तीतील फरासखाना पोलिस ठाण्याच्या आवारात दीड वर्षापूर्वी झालेल्या स्फोट प्रकरणी सिमीच्या 4 दहशतवाद्यांना आज तेलंगणा पोलिसांनी अटक केली आहे. फरासखाना पोलिस ठाण्याच्या पार्किंगमध्ये उभ्या केलेल्या स्प्लेंडर मोटारसायकलच्या डिकीत 10 जुलै 2014 रोजी दुपारच्या सुमारास स्फोट झाला होता. या स्फोटात पाचजण जखमी झाले होते. मात्र, या प्रकरणी राज्य दहशतवादी विरोधी पथकाला ठोस असे धागेदोरे अद्याप मिळालेले नव्हते.
आंध्र प्रदेश व ओडिशा राज्याच्या सीमेवर या दहशतवाद्यांना अटक करण्यात आली. तेलंगणा एटीएसला माहिती मिळाल्यानंतर त्यांनी याबाबतची माहिती ओडिशा व आंध्र पोलिसांना दिली. त्यानंतर या तिघांनी केलेल्या संयुक्त कारवाईत या चौघांना पकडण्यात आले. गुड्डू झाकिर व अमजद अशी अटक करण्यात आलेल्या दोन प्रमुख आरोपींची नावे आहेत. इतर दोघांची नावे समजू शकली नाहीत.

या स्फोटात एका पोलिस कॉन्स्टेबलसह चार जण जखमी झाले होते. तसेच तीन-चार दुचाकी गाड्यांचे नुकसान झाले होते. या स्फोटासाठी आयईडी वापरण्यात आले होते. स्फोटासाठी बॉल बेअरिंग, खिळे आणि छर्रे याचा वापर झाल्याचे तपासात निष्पन्न झाले होते. आता दीड वर्षानंतर या घटनेमागे सिमीचा हात असल्याचे समोर येत आहे.