आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सुरेश कलमाडींचे छगन भुजबळांकडून कौतुक, २६ व्या पुणे फेस्टिव्हलचे दिमाखदार उदघाटन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - पुणे सांस्कृतिक शिक्षणाचे माहेरघर म्हणून प्रसिद्ध आहे. पुणे फेस्टिव्हलने या सांस्कृतिक शहराला जागतिक सांस्कृतिक शहर म्हणून मान्यता मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले आहेत. पुणे शहराला सांस्कृतिक क्रीडा क्षेत्रात पुढे नेण्यात माजी खासदार सुरेश कलमाडी यांचा सिंहाचा वाटा असल्याचे मत राज्याचे पर्यटनमंत्री छगन भुजबळ यांनी शुक्रवारी व्यक्त केले.
२६ व्या पुणे फेस्टिव्हलचे उद्घाटन भुजबळ यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आले त्या वेळी ते बोलत होते. व्यासपीठावर अभिनेत्री हेमामालिनी, करिश्मा कपूर, ईशा कोप्पीकर, बिंदू, जितेंद्र, सचिन पिळगावकर, रझा मुराद, अल्ताफ शिवदासानी, सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, उद्योजक राहुल बजाज, खासदार रजनी पाटील, खासदार शिवाजी आढळराव पाटील, सुरेश कलमाडी, मीरा कलमाडी, दिलीप पाडगावकर, धर्मस्थळ वीरेंद्र हेडगे, सुशील मेहनुब उपस्थित होते.

हेमामालिनी म्हणाल्या, मागील 25 वर्षांपासून मी या फेस्टिव्हलमध्ये सहभागी होत असून या व्यासीपठावर दरवर्षी नवीन नृत्य सादर करणे माझ्यासाठी आनंददायी असते. अशा फेस्टिव्हलमुळे कलाकारांना पुढे येऊन प्रेक्षकांसमोर आपली कला सादरीकरणाची संधी मिळते. विभिन्न ठिकाणाहून येऊन विविध प्रकारचे कलाकार आपली कला याठिकाणी सादर करतात, असेही त्या म्हणाल्या. सचिन म्हणाले, 50 वर्षांचा चित्रपटसृष्टीतील माझा प्रवास एकट्याचा नसून तो रसिक प्रेक्षक ज्यांनी मला सांभाळून घेतले अशा वरिष्ठांच्या पाठिंब्यामुळे झाला आहे.
जितेंद्र म्हणाले, लहानपणी गिरगावात गणपतीत मी अनेकदा नृत्य केले आहे. शेजारी असलेल्या मराठी कुटुंबामुळे मी मराठी शिकलो, त्यामुळेच मी पुढे अभिनेता झालो.
पुण्यात आता गाड्यांचा आवाज- राहुल बजाज म्हणाले, माझे मित्र जसवंतिसंग पुण्यात शिक्षण घेत असताना पुण्यातील गल्लीमध्ये संगीताचा आवाज कानात घुमे. मात्र, आता गाड्यांच्या आवाजामुळे संगीताचा आवाज कमी झाला असून त्याला थोडाफार प्रमाणात मीही जबाबदार आहे. कलमाडींचा नामोल्लेख टाळत ते म्हणाले, भारतीय संगीतात ज्यांना रुची आहे असे लोक घोटाळेबाज होऊ शकत नाहीत, ते चांगलेच असतात.